अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर अजूनही सुरूच आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांना या महामारीचा फटका बसत आहे. गेल्या एकही दिवसांत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाच्या विळख्याने बऱ्याच लोकांना जखडले आहे. यामध्ये सामान्य नागरिक ते राजकीय नेते आणि खेळाडू ते बॉलीवूडचे सेलिब्रीटी या क्षेत्रातील बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाली.
तसेच आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे काजोलच्या चाहत्यांना या बातमीने मोठा धक्का बसला आहे.
त्याचबरोबर आता चाहते तिच्या आरोग्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थना करत आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची इंस्टाग्राम पोस्टबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची इंस्टाग्राम पोस्टअभिनेत्री काजोल आपली मुलगी न्यासाला मिस करत असल्याची एक पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.
पोस्ट शेअर करताना आपली मुलगी न्यासाचा फोटो जोडत काजोलने लिहिले की, मला कोरोना झाला आहे आणि माझे रुडॉल्फ नाक कुणालाही दिसावे असे मला वाटत नाही,
यासाठी जगातील सर्वात गोंडस स्माईल (न्यासाचे हसणे), न्यासा देवगण तुला खूप मिस करत आहे. त्याच वेळी, काजोलचे चाहते तिला धीर देत आहेत
आणि ती लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही काजोलच्या मुलीचे कौतुक करत काजोलसाठी प्रार्थना केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम