Bone health : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात करा ‘या’ सुपरफूडचा समावेश; जाणवतील अनेक फायदे…

Ahmednagarlive24 office
Updated:
Bone health

Bone health : ड्राय फ्रुट खाणे प्रत्येकाला आवडते, ड्राय फ्रुट आपल्या आरोग्यसाठी खूप चांगले मानले जाते, तसे ड्राय फ्रुटमध्ये बहुतेक जणांना काजू खायला खूप आवडते. काजू देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काजूमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे निरोगी शरीरासाठी आवश्यक असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज काजूचे सेवन केले तर तुम्ही नेहमी निरोगी आणि आनंदी राहाल.

काजूमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6 आणि मॅग्नेशियम आढळते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. म्हणजेच सांधे किंवा हाडे दुखत असतील तर काजूचे नियमित सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काजू खाल्ल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. याव्यतिरिक्त, हाडे विकसित होतात आणि वेदना देखील कमी होतात. त्यामुळे काजूचे सेवन अवश्य केले पाहिजे. आज आपण हाडांसाठी काजूचे कसे सेवन करायचे हे जाणून घेणार आहोत.

हाडे मजबूत करण्यासाठी काजू कसे खावेत?

-हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही दुधात भिजवलेल्या काजूचे सेवन करू शकता. यासाठी एका ग्लास दुधात ५-६ काजू भिजवा. रात्रभर ते तसेच ठेवा. सकाळी उठल्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी ते बिजवलेले काजू आणि दूध घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू दुधात उकळूनही देखील त्याचे सेवन करू शकता. दुधात भिजवलेल्या काजूचे सेवन केल्यास शरीराला कॅल्शियमही मिळते. त्याच वेळी, काजूमध्ये व्हिटॅमिन के, बी6 आणि मॅग्नेशियम देखील असते, जे हाडे मजबूत करतात. दुधात भिजवलेले काजू खाल्ल्याने हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. तसेच, स्नायू देखील विकसित होतील.

-जर तुम्हाला दुधात भिजवलेले काजू आवडत नसतील तर तुम्ही ते पाण्यात भिजवलेले काजूही खाऊ शकता. पाण्यात भिजवलेले काजू खाल्ल्यानेही हाडे मजबूत होतात. यासाठी रोज रात्री 6-7 काजू एका ग्लास पाण्यात भिजवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.

-तुम्ही स्मूदीमध्ये देखील काजू टाकून पिऊ शकता. यासाठी तुम्ही एक ग्लास दूध घ्या. त्यात केळी आणि ५-६ काजू घाला. आता ते चांगले बारीक करून घ्या. रोज सकाळी स्मूदीसोबत काजू खाल्ल्याने तुम्हाला खूप फायदे होतील. दूध आणि केळीमुळे तुमची हाडे मजबूत होतील. तसेच, सांधेदुखी कमी होण्यास मदत होईल.

-तसेच तुम्ही काजूचे इतर ड्राय फ्रुट बरोबर देखील त्याचे सेवन करू शकता. तुम्ही 2-3 बदाम, 4-5 मनुके, 1 अक्रोडाचे दाणे आणि 3-4 काजू रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर या सर्वांचे एकत्र सेवन करा. यासोबत तुम्हाला सर्व ड्रायफ्रुट्सचे फायदे मिळतील. बदाम, मनुका, अक्रोड आणि काजू एकत्र खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe