‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत वांगी ! वांगी खाण्याआधी त्याचे तोटे जाणून घ्या

Published on -

Brinjal Side Effects : कोरोना काळापासून आपण सर्वजण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ लागलोय. पण कित्येकदा काळजी घेऊन सुद्धा आरोग्य धोक्यात येते. दरम्यान जर तुम्हालाही वांगी खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.

खरेतर काही लोकांनी वांगे खाणे त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. पण माहिती नसल्याने ही लोक बिनधास्त वांग्याचे सेवन करतात. पण आज आपण कोणत्या लोकांनी वांग्याचे सेवन करू नये याची माहिती पाहणार आहोत.

वांग्याचे भरीत किंवा त्याची भाजी तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. वांग्याचं भरीत तसेच बेंगन मसाला अनेकांना आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का ही भाजी काही लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील असू शकते.  

अनेकांना वांग्याची भाजी आवडते. पण संधिवात आणि सांधे दुखी असणाऱ्या रुग्णांना वांग्याची भाजी खाऊ नये असे असायला दिला जातो. टोमॅटो, बटाटे, शिमला मिरची, वांगी अशा नाईटशेड भाज्या संधिवात आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरतात. या भाज्यांमध्ये सोलानिन असतो. हा घटक संधिवात रुग्णांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण वाढवतो असा दावा करण्यात आला आहे.

वांग्याचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. याच्या सेवनाने गॅस, आम्लता सारख्या समस्या वाढतात. वांगी खाल्ल्याने पचनाचे कार्य व्यवस्थित होत नाही. यामुळे पचनाच्या समस्या असतील अशा लोकांनी वांगी खाऊ नयेत. 

किडनीशी संबंधित आजार असणाऱ्या लोकांनी सुद्धा वांगे खाऊ नये. यात ऑक्सलेट नावाचा घटक असतो. यामुळे मुतखडा होतो. अशा स्थितीत मुतखडा असणाऱ्या लोकांनी वांगी खाऊ नयेत. 

वांग्यात असणाऱ्या सोलानीनमुळे एलर्जीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ज्या लोकांना ऍलर्जी असेल त्यांनी वांगी खाऊ नयेत. वांगी खाल्ल्यानंतर शरीर सुजत असेल अंगावर खाज सुटत असेल तर तुम्ही वांगी खाणे टाळायला हवे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe