Brush Tips : दात घासताना किती टूथपेस्ट वापरली पाहिजे ? एक चूक तुमचे दात कायमचे खराब करू शकते…

सकाळी उठल्यावर ब्रश करताना तुम्ही एक साधी पण मोठी चूक तर करत नाही ना? बऱ्याच जणांना वाटतं, की जास्त टूथपेस्ट लावली की दात जास्त स्वच्छ होतात — पण खरं सांगायचं तर, यामुळे तुमचे दात कायमचे खराब होऊ शकतात! चला तर मग, योग्य प्रमाण आणि पद्धती जाणून घेऊया...

Published on -

Brush Tips : वाचकहो सकाळी उठून आपण सगळ्यात आधी ब्रश करत असतो. काय तुम्ही कधी विचार केला आहे की ब्रश करताना किती टूथपेस्टचा वापर केला पाहिजे? जास्त टूथपेस्ट लावून ब्रश केल्याने दात जास्त स्वच्छ होतात, असं तुम्ही मानत असाल तर ही तुमची चूक आहे. गरजेपेक्षा जास्त टूथपेस्टचा वापरही दातांना नुकसान पोहोचवू शकतो.

टूथपेस्टचे काम काय आहे

टूथपेस्टमध्ये उपस्थित असलेली तत्त्वे दातांमध्ये अडकलेले अन्नकण आणि त्यांच्या पृष्ठभागावर जमा झालेल्या पिवळेपणाला दूर करण्यात मदत करतात. टूथपेस्ट तोंडामध्ये असलेल्या बॅक्टेरियांना कमी करते, ज्यामुळे श्वासातील दुर्गंधी कमी होते.

टूथपेस्टमध्ये असणारे फ्लोराईड दातांचे इनॅमल म्हणजे दातांच्या बाहेरच्या पृष्ठभागावरील भाग मजबूत करते आणि केव्हिटीपासून बचाव करते. टूथपेस्टमधील तत्त्वे हिरड्यांच्या सुजेला कमी करण्यात मदत करतात. काही टूथपेस्टमध्ये दातांना चमकदार बनवणाऱ्या विशेष तत्त्वांचा वापर केलेला असतो.

जास्त का वापरू नये?

टूथपेस्टमध्ये असलेले फ्लोराईड तत्त्व तसे पाहता दातांना मजबूत करण्याचे काम करते, पण जास्त प्रमाणात त्याचा वापर केल्यामुळे दातांवर पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाचे डाग पडतात, ज्याला फ्लोरोसिस म्हणतात. जास्तीचे फ्लोराईड दातांच्या इनॅमललाही नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे दात खराब होण्याची शक्यता वाढते.

काही केसमध्ये जर मुलाने टूथपेस्ट गिळली, तर त्याला उलट्या, पोटात दुखणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. असे होऊ नये म्हणून मूल ब्रशने दात घासून जोपर्यंत गुळण्या करायला शिकत नाही, तोपर्यंत त्याला तुमच्या देखरेखीखालीच ब्रश करायला लावले पाहिजे.

केवढी टूथपेस्ट वापरावी ?

तीन वर्षांचे लहान मूल असेल, तर त्याला तांदळाच्या दाण्याएवढीच टूथपेस्ट दिली पाहिजे; तर तीन वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक वाटाण्याच्या दाण्याएवढ्या टूथपेस्टचा वापर करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe