Budhaditya rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनासह पृथ्वीवरही दिसून येतो. ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलत असतात, अशावेळेला ग्रहांचा संयोग देखील होतो. नवीन वर्षातही ग्रहांचा संयोग पाहायला मिळणार आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.
जानेवारी महिन्यात बुध, शुक्र, गुरू आणि चंद्र या तीन ग्रहांचा संयोग तयार होणार आहे, ज्यामुळे 2 राजयोग देखील तयार होणार आहेत. अशास्थितीत काही राशींना याचा खूप फायदा होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा कारक बुध 7 जानेवारीला वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे, तर भौतिक सुख, सौंदर्य आणि कीर्तीचा कारक शुक्र देखील वृश्चिक राशीतून बाहेर पडून 18 जानेवारी रोजी धनु राशीत प्रवेश करणार आहे. या काळात धनु राशीत शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे.
तर 18 जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत प्रवेश करेल, जिथे गुरू आधीच मार्गी अवस्थेत स्थित आहे, अशा स्थितीत गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे पुन्हा एकदा गजकेसरी राजयोग तयार होईल. जो काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जात आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी चला पाहूया…
मीन
लक्ष्मी नारायण आणि गजकेसरी राजयोग तयार मीन राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल. या काळात कर्मचाऱ्याचा पगार आणि पद वाढू शकते. सन्मान आणि संपत्तीत वाढ होईल. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. यावेळी व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो आणि त्यांचा व्यवसाय वाढू शकतो. अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. बर्याच दिवसांपासून अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल.
धनु
गजकेसरी आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती या राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने आत्मविश्वास वाढेल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. या काळात उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील उघडतील. तुमच्या जोडीदाराची यावेळी प्रगती होऊ शकते. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. गजकेसरी राजयोगातून मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळेल.
कुंभ
लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती खूप शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. गुंतवणुकीत यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्हाला मुलगा किंवा नातू मिळू शकतो. बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने धनाचे आगमन चांगले होईल. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरी यातूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मेष
करिअरमध्ये नवे यश मिळेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. नोकरी, व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुध-शुक्र यांच्या संयोगामुळे नशीब तुमच्या बाजूने असू शकते. तुम्ही तुमच्या योजनांमध्ये यश मिळवू शकता. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. वडील आणि वडिलोपार्जित मालमत्तेतूनही तुम्हाला आनंद मिळेल. देश-विदेशात सहलीला जाता येईल. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील.