Budhaditya Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात बुध हा ग्रहांचा राजकुमार आणि सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. हे ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा विशेष योग तयार होतात. ज्याचा फायदा सर्व राशींना होतो. सध्या सूर्य धनु राशीत असून आज ७ जानेवारीला बुध वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत बुध आणि सूर्य यांचा धनु राशीत एक खास संयोग होईल. तसेच या काळात बुधादित्य राजयोग देखील तयार होईल. जो सर्वांना शुभ परिणाम देईल.
हा राजयोग 3 राशींचे भाग्य उजळवेल. पण, हा राजयोग फारच कमी काळ टिकेल कारण सूर्य 14-15 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे. या काळात धनु राशीत सूर्य, मंगळ आणि बुध एकत्र असल्याने त्रिग्रही योगही तयार होत आहे, ज्याचा देखील शुभ प्रभाव राशींवर पडेल.

मेष
तुम्हाला सूर्य आणि बुध ग्रहांची साथ मिळेल. बुधादित्य राजयोगाच्या माध्यमातून करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल, नोकरीच्या संधी मिळू शकतात. सरकारी नोकरीचा शोध पूर्ण होऊ होईल. समाजात मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते, जे उमेदवार सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. त्रिग्रही योग करिअर आणि व्यवसायातही मोठे यश मिळवून देऊ शकतो. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तुम्हाला कामातही यश मिळेल
धनु
सूर्य आणि बुधाच्या संयोगाने बनलेला बुधादित्य राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. व्यावसायिकांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि नवीन स्रोत देखील उघडतील. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत अपेक्षित यश मिळेल आणि एखादी चांगली बातमी मिळू शकेल. त्रिग्रही योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल आणि धैर्य आणि शौर्य वाढवेल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. उद्योगपतींचे काही मोठे सौदे फायनल होऊ शकतात.
कन्या
बुधाचे संक्रमण आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानली जात आहे. या काळात वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. घर, जमीन आणि मालमत्तेत गुंतवणूक करण्याची चांगली संधी मिळेल. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. व्यवसायासाठी वेळ उत्तम राहील. नशीब तुमची पूर्ण साथ देईल. तुम्ही यावेळी काही चैनीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता. जर तुम्ही मेडिकल, मेडिसिन, रिअल इस्टेट, रिअल इस्टेट आणि हॉटेल लाइनशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी चांगला नफा मिळू शकतो. पैसा कमावण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील. जीवनात सुख-समृद्धी वाढेल.