Chanakya Niti: सावधान ! ‘ह्या’ 4 चुकांमुळे घरातून बाहेर पडते लक्ष्मी ; होते धनहानी , वाचा सविस्तर

Published on -

Chanakya Niti:  देशाचे महान अर्थशास्त्रज्ञ , विद्वान म्हणून संपूर्ण जगात ओळख असणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी  संपत्ती संदर्भात देखील अनेक  महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या नीतीनुसार माणूस नकळत किंवा जाणूनबुजून दररोज अशा अनेक चुका करतो ज्यामुळे त्याला मोठी धनहानी  होते आणि त्याच्यावर लक्ष्मी देवी देखील क्रोधित होते आणि त्याचा घर सोडून निघून जाते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या चुकांबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे लक्ष्मी देवी क्रोधित होते आणि घर सोडून निघून जाते.

संध्याकाळी झाडू

सूर्यास्तानंतर घर झाडूनही माता लक्ष्मीचा राग येतो. चाणक्य सांगतात की, संध्याकाळी कधीही घर झाडू नये. वास्तविक झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच संध्याकाळी झाडू लावणे टाळा. काही कारणास्तव संध्याकाळी घर झाडून घ्यावं लागलं तर गोळा केलेला कचरा लगेच बाहेर काढू नका. दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानंतरच त्याला घराबाहेर काढा.

पैसे खर्च करणे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जे लोक अनावश्यकपणे पैसे खर्च करतात किंवा दिखावा करतात त्यांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. अशा लोकांवर जेव्हा आर्थिक संकट येते तेव्हा त्यांना फार काळ दिलासा मिळत नाही. चाणक्य म्हणतात की असे लोक स्वतःच त्यांच्या विनाशाचा मार्ग उघडतात. माणसाने नेहमी योग्य ठिकाणी पैसा खर्च केला पाहिजे.

खरकटी भांडी

चाणक्याच्या मते, स्वयंपाकाच्या गॅसवर चुकूनही खरकटी भांडी ठेवू नयेत. चुलीवर किंवा शेजारी खरकटी भांडी ठेवल्यानेही माता लक्ष्मीचा कोप होतो. याचा घरातील सुख-शांतीवर वाईट परिणाम होतो. इज्जत कमी होऊ लागते आणि घरात गरिबी राहते. आई लक्ष्मी घरातून निघून जाणे म्हणजे आर्थिक आघाडीवर तुमचा वाईट काळ लवकरच सुरू होणार आहे.

वर्तन किंवा आचरण

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे ज्येष्ठ, विद्वान, महिला किंवा गरिबांना त्रास देतात. त्यांचा अपमान करते त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा कधीच नसते. जे इतरांशी वाईट वागतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी कोपलेली असते. याशिवाय जे पालक किंवा शिक्षकांशी अपशब्द बोलतात, त्यांना लक्ष्मीची कृपा कधीच मिळत नाही. देवीच्या कृपेचा प्रभाव संपताच हे लोक पाई-पाईसाठी तळमळू लागतात.

हे पण वाचा :- Airtel Recharge :  अर्रर्र .. एअरटेलच्या ग्राहकांना मोठा धक्का!  सर्वात स्वस्त प्लॅन बंद ; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe