Chanakya Niti : चाणक्यांच्या मते अशा मुलीशी लग्न केल्यास पतीचे बदलते नशीब! आयुष्य बनते स्वर्गाप्रमाणे

Ahmednagarlive24 office
Published:
Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे केवळ महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी नव्हते तर ते आपल्या धोरणांच्या बळावर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य या एका सामान्य बालकाला भारताचा सम्राट बनवले होते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली धोरणे फक्त राज्यकारभारासाठीच नव्हे तर आजही मानवी जीवनात खूप फायद्याची ठरत आहेत.

त्यांनी आपल्या चाणक्य निती शास्त्रामध्ये जीवनसाथी निवडण्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. काय आहेत या गोष्टी जाणून घ्या, सविस्तर.

सगळ्या नात्यांपेक्षा पती-पत्नीचे नाते खूप वेगळे असते. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की हे संबंध पूर्वीपासून तयार होत असतात. दरम्यान, अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या आपल्या पतीचे भाग्य बदलतात.

त्यामुळेच या बायका पतींसाठी भाग्यवान ठरल्याचे बोलले जाते. आचार्य चाणक्य यांच्याकडून देखील याचे समर्थन केले जाते. ते म्हणतात की पत्नींच्या काही विशेष गुण पतीला भाग्यवान बनविण्यासाठी फायद्याचे ठरतात.

हे आहेत ते खास गुण

वरयेत् कुलजन प्रग्यो विरुपमपि कन्यकम् ।
रूपशीलं न निश्चस्य विवाहः सदर्षे कुळे ।

  • वरील श्लोकानुसार, विवाहापूर्वी जोडीदार निवडताना व्यक्तीने गुणांचा विचार करावा.
  • चाणक्य नीतिनुसार पुरुषांनी कधीही कोणत्याही सुंदर स्त्रियांच्या मागे धावू नये. आचार्य चाणक्यांच्या मते पत्नी सद्गुणी असल्यास ती संकटाच्या वेळीही आपल्या कुटुंबाची काळजी घेते.
  • तसेच कोणत्याही स्त्रीला बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त असावे.
  • चाणक्यांच्या नीतीनुसार धर्मकर्मावर विश्वास ठेवणारी व्यक्ती अतिशय नम्र असते.
  • क्रोध हा खूप मोठा शत्रू आहे. त्यामुळे चाणक्य असे सांगतात की ज्या स्त्रीला खूप लवकर राग येतो ती कुटुंबाला कधीच सुखी ठेवू शकत नाही.
  • सर्वात म्हत्ववाचे म्हणजे स्वतःच्या इच्छेने लग्न न करणाऱ्या स्त्रीशी चुकूनही लग्न करू नका. कारण अशा स्त्रीला आनंदी ठेवता येत नाही, तसेच ती तुमचा आदर करू शकत नाही.

आचार्य चाणक्यांच्या मतानुसार कौटुंबिक विकासामध्ये स्त्रीचे एक महत्त्वपूर्ण योगदान असते. कुटुंबातील सदस्यांची खूप प्रगती होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe