Chanakya Niti : प्रयत्न करूनही यश मिळत नाही ? तर वापरा चाणक्यांच्या ‘या’ टिप्स, बदलेल नशीब

Ahmednagarlive24 office
Published:
Chanakya Niti

Chanakya Niti : आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांच्याकडे सर्वोत्तम जीवनाचे गुरु म्हणून पाहण्यात येते. त्यांचे मत आजच्या काळातही खरे ठरते. हे लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 24 तास असतात, परंतु, आपण या 24 तासांचा वापर कसा करून घेतो त्यावरून आपणाला आपली ध्येय साध्य करता येतात.

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या आयुष्यात नक्कीच यश मिळते. हे लक्षात ठेवा की असे अनेक लोक आहेत ज्यांना खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. चाणक्यांच्या मते, कलियुगातील बदलत्या काळानुसार तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करावे. नाहीतर तुम्हाला यश मिळत नाही.

यद् दूर यद् दुराराध्याम यच दुर प्रणालीतम् । तत्सर्वं तपसा साध्यम् तपो हि दुर्तिक्रमम् । ,

आचार्य चाणक्य यांच्या या श्लोकामध्ये असे सांगण्यात येत आहे की कठीण प्रसंगी कठोर परिश्रम करूनच संकटातून बाहेर येता येते, हे लक्षात ठेवा की कोणतीही समस्या ही कठोर परिश्रमाने सोडवता येते. यानुसार समजा एखादी गोष्ट तुमच्यापासून कितीही दूर असली किंवा ती मिळवणे तुम्हाला कितीही अवघड वाटत असले तरी तुम्ही तुमच्या मेहनतीची बाजू कधीही सोडू नका. कठोर परिश्रमाने करता राहावे. कारण कठोर परिश्रमाने सर्व काही मिळवता येते.

चाणक्य यांच्या मतानुसार एक आळशी व्यक्ती नेहमी म्हणत राहतो की त्याला संधी मिळाली नाही, तर दुसरीकडे, एक मेहनती व्यक्ती स्वतः संधीच्या शोधात असतो. त्यामुळे इतकेच नाही तर मेहनती व्यक्ती नेहमी आपले ध्येय साध्य करण्यासाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम करत असते याचाच असा अर्थ आहे की त्याने कधीही समस्येचा विचार करू नये.

आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, ध्येय साध्य करण्यासाठी फक्त नशिबाला दोष देणे बरोबर नाही. कारण जर एखाद्या कठीण परिस्थितीत तुमच्याकडून सतत प्रयत्न करूनही ध्येय साध्य होत नसल्यास काम करण्याची पद्धत बदलावी. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयात नक्कीच यश मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe