Chanakyaniti : नवीन वर्ष सुरु होऊन आता पाच महिने झाले आहेत. या पाच महिन्यांत देशाने व जगाने बरीच स्थित्यंतरे अनुभवली. जगातील अनेक देशांत तणाव तर झालाच, पण अनेक देशांनी भूकंपही अनुभवला. याशिवाय जगात आर्थिक मंदीचे सावटही घोंगावतेय. या सगळ्या प्रकारांमुळे आपल्याला स्वतःकडे बघणे आवश्यक आहे. कारण स्वतःतील क्षमता ओळखूनच आपल्याला आपली प्रगती साधता येणार आहे. आचार्य चाणक्यांनी सांगितेल्या तीन गोष्टी आपण अंगिकारल्या, तर आपल्याला नक्कीच प्रगती साधता येईल.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात मानवी जीवनातील प्रत्येक पैलूचा उल्लेख केला आहे. चाणक्यांच्या मते, जीवनातील अपयशांना कधीही घाबरू नये. एखाद्या व्यक्तीने अपयशातून शिकून आपल्या आयुष्यात पुढे जावे. यश एक ना एक दिवस तुमच्याकडे येतेच फक्त त्यासाठी संयम हवा. जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवाच असेल, तर आचार्यांनी सांगितलेल्या 3 गोष्टी कधीही विसरू नका. या तीन गोष्टी कोणत्या ते आपण पाहू…

1. पैसे वाचवणे
चाणक्य निती सांगते की, विचार न करता कधीही पैसे खर्च करू नका. पैसा ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या वाईट काळात कामी येते. संकटाच्या वेळी सर्व माणसे एकत्र आल्यावर पैसा खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. त्यामुळे पैशाचा अपव्यय न करता तो चांगल्या पद्धतीने साठवून ठेवण्याचा सल्ला आचार्य चाणक्य देतात.
2. वेळ
चाणक्य नितीनुसार वेळ खूप मौल्यवान आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. म्हणूनच वेळ कधीही वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक क्षण माणसाला काहीतरी शिकवत असतो. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचा आदर करा. या गोष्टीमुळे तुम्हाला नेहमी यश मिळेल. वेळ कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे ती कायम बदलत असते.
3. निंदा
चाणक्य नीतीनुसार आपण कधीही इतरांवर टीका करू नये. निंदा ऐकू नका, कुणावर ही निंदा करू नका. जेव्हा आपण कोणावर टीका करातो तेव्हा आपण अपयशाच्या मार्गवर जात असतो. निंदा कोणाच्याही मन नकारात्मकतेची भावना वाढवते. त्यामुळे मानसिक तणावही वाढतो आणि मनही अस्वस्थ होते. त्यामुळे कुणाचीही निंदा करण्यापासून स्वतःला वाचविण्याचा सल्ला आचार्य चाणक्य देतात.