अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- DA Arrear latest news : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यांसह होळीचा सण जबरदस्त असणार आहे. कारण येत्या मार्चमध्ये सध्याच्या पगारासह ३ टक्के महागाई भत्त्याचा लाभही मिळणार आहे.
म्हणजे मार्च महिन्याच्या पगारापासून त्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता (DA) दिला जाईल. पण, यात विशेष बाब म्हणजे याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२२ पासून करण्यात आली आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२२ पासूनच ३४ टक्के दराने पैसे मिळतील.
त्यांना मार्च महिन्याच्या पगारात पूर्ण रक्कम दिली जाईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी (2 महिन्यांची) थकबाकीही मिळेल. केंद्रीय कर्मचार्यांना मार्च महिन्याचा पगार पूर्ण दिला जाईल. म्हणजे सर्व पैसे त्यांना होळीनंतर मिळतील. महागाई भत्त्यात (DA Hike) ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जानेवारी 2022 च्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याने, थकबाकी देखील उपलब्ध होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के डीएसह थकबाकीही दिली जाईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८,००० ते ५६,९०० रुपये आहे. जर 34 टक्के नवीन महागाई भत्ता 56,900 रुपयांच्या कमाल मूळ पगारावर मोजला, तर 19,346 रुपये प्रति महिना DA होतो.
त्याच वेळी, आतापर्यंत जे पेमेंट केले गेले आहे ते 31 टक्के दराने 17,639 रुपये प्रति महिना केले गेले आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरमहा १,७०७ रुपयांनी वाढ झाली आहे.
वार्षिक आधारावर ही वाढ 20,484 रुपये असेल. 2 महिन्यांची थकबाकी मार्च महिन्यात मिळणार आहे. अशा स्थितीत हिशोब केला तर एका कर्मचाऱ्यालाही ३८,६९२ रुपये थकबाकी मिळेल.
किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवर थकबाकी मोजली तर सध्या कर्मचाऱ्याला 5,580 रुपये डीए मिळत आहे, जो 31 टक्के डीए नुसार आहे.
आता त्यात 3 टक्के अधिक जोडले तर तुम्हाला 6,120 रुपये मिळतील. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात ५४० रुपयांची वाढ होणार आहे. 2 महिन्यांची थकबाकी सुमारे 1,080 रुपये होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम