Dark Circles : चेहऱ्यावर मुरुम, पुरळ किंवा कोणतेही डाग असतील तर सौंदर्य बिघडवते. त्याचबरोबर डोळ्यांखाली काळे डाग पडत असतील तर ही देखील समस्या आहे. यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. डोळ्या खालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी अनेकजण अनेक प्रकारच्या ब्युटी क्रिमचा वापर करतात. पण क्रीमच्या वापरासह साइड इफेक्ट्सच्या देखील समस्या आहेत.
त्यामुळे आणखी अडचणी वाढतात. अशा स्थितीत तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास या समस्येपासून लवकरच सुटका मिळू शकते. आणि यामुळे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत.
-तुम्ही डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करू शकता. हे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले रासायनिक घटक त्वचेसह डोळ्यांखालील काळ्या डागांच्या समस्येपासून मुक्त होण्यास खूप मदत करतात. यासाठी 15 मिनिटांसाठी कोरफडीचे जेल डोळ्याखाली लावा. त्यानंतर पाण्याने धुवा. असे काही दिवस नियमित केल्याने त्याचा परिणाम नक्कीच दिसून येईल.
-डोळ्यांखालील काळे डाग पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बटाटा आणि काकडीचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला बटाटे आणि काकडीचे तुकडे करावे लागतील आणि नियमितपणे 10 ते 15 मिनिटे डोळ्यावर ठेवावे लागतील. असे केल्याने त्याचा प्रभाव काही दिवसात दिसू लागतो.
-गुलाब पाण्याचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. डोळ्यांखालील काळे डाग दूर करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटे डोळ्याखाली गुलाबपाणी लावावे लागेल. त्यानंतर डोळे थंड पाण्याने धुवावेत.
-डोळ्यांखालील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटो आणि लिंबाचा रस देखील वापरता येतो. यासाठी एक चमचा टोमॅटोच्या रसात 4-5 थेंब लिंबाचा रस मिसळा आणि 10 ते 15 मिनिटे कापसाने डोळ्यांखाली लावा. हे नियमित केल्यास काही दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल.
-डोळ्यांखालील काळ्या डागांवरही बदामाचे तेल देखील खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही बदामाच्या तेलाचे 2 ते 3 थेंब रोज डोळ्यांखाली लावले तर काही दिवसातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल.