व्हॉट्सअॅप चॅट डिलीट झालीये का ? काळजी नको ; हा मार्ग वापरा आणि डिलीटेड मेसेज पुन्हा मिळवा…

Published on -

व्हॉट्सअॅपवरील चॅट डिलीट झाले की ते रिकव्हर कसे करायचे,असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल.आज आम्ही तुम्हाला याचविषयी माहिती देणार आहोत. काही वेळा चुकून व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट केले जातात. जर तुमच्यासोबत असं झालं असेल तर काळजी करू नका.तुम्ही डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज कसे रिकव्हर करू शकता, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.यासाठी काही ट्रिक्स जाणून घ्या.

तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.आता तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट डिलीट झाले तरी चिंता करू नका. ते रिकव्हर करता येईल. यासाठी तुम्ही काय कराल, याची माहिती आज आम्ही तुम्हाला अगदी सविस्तर देणार आहोत.

आजकाल व्हॉट्सअॅप खूप लोकप्रिय बनले आहे. त्याचा उपयोग मित्र-मैत्रिणींशी आणि कुटुंबीयांशी बोलण्यासाठीच नाही तर अनेक ठिकाणी ऑफिसच्या कामातही केला जातो.पण काही वेळा चुकून तुमचे मेसेज डिलीट केले जातात.जर तुमच्यासोबत असं झालं असेल तर काळजी करू नका.यावर आम्ही तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहोत.

तुम्ही डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज कसे रिकव्हर करू शकता, याविषयी आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या फोन किंवा संगणकावरून तुमचे मेसेज रिकव्हर करू शकता.

अँड्रॉईड युजर्स कसे मेसेज रिकव्हर करणार ?

तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल आणि व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमचे चॅट सुरक्षित ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे गुगल ड्राइव्हवर आपल्या चॅटचा बॅकअप घेण्यासाठी व्हॉट्सअॅप सेट करणे. याशिवाय व्हॉट्सअॅप आपोआप तुमच्या फोनच्या मेमरीमध्ये बॅकअप तयार करतो. म्हणजेच चुकून तुम्ही चॅट डिलीट केले असेल तर ते तुम्ही तुमच्या फोनच्या मेमरीतूनही परत आणू शकता.

व्हॉट्सअॅप मेसेज रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या डिव्हाईसच्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप /डेटाबेस फोल्डरमध्ये अॅक्सेस करावे लागेल. येथे तुम्हाला नवीन बॅकअप फाईल मिळेल, ज्याचे नाव msgstore-sqsv-MM-sx.1.db. crypt14 आहे (जिथे sqsv-MM-sx शेवटच्या बॅकअपची तारीख आहे). या फाईलचे नाव बदलून msgstore.db. crypt14 करा. त्यानंतर व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करन,रिइन्स्टॉल करा आणि सेटअप दरम्यान ‘Restore’ पर्याय निवडा.

गुगल ड्राइव्हवर सेव्ह केलेल्या पोस्ट कशा मिळवाल ?

तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप पोस्ट गुगल ड्राइव्हवर सेव्ह केल्या असतील तर तुम्ही त्या परत मिळवू शकता. तुम्हाला व्हॉट्सअॅप काढून पुन्हा इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर टाकावा लागेल आणि एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला एक पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या जुन्या गोष्टी परत मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe