अंकशास्त्रावर सध्या अनेक जण विश्वास ठेवतात. अंकशास्त्रावरुन अनेकांचा स्वभावगूण जसा कळतो, तसाच त्यांचा मूडही कळतो. प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विशेष गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. याच पद्धतीत काही मुलांक हे प्रेमाच्या बाबतीत खूप लकी तर काही अनलकी मानले जातेत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला होतो, त्यांचा मूळ अंक ५ असतो. हा नंबर बुधाशी संबंधीत असल्याने तो प्रेमाच्या बाबतीत थोडा अनलकी असतो, असे मानले जाते.
कसा असोत स्वभाव
ज्यांचा मुलांक पाच आहे त्यांचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जातो. या क्रमांकाचे लोक खूप बुद्धिमान, धाडसी आणि मेहनती असतात. परंतु प्रेमाच्या बाबतीत या क्रमांकाचे लोक खूप दुर्दैवी असतात. 5 अंकाचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बरेच काही साध्य करतात. परंतु प्रेम संबंधांच्या बाबतीत हे लोक खूप दुर्दैवी असतात. या राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध जास्त काळ टिकत नाहीत. एकतर त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून फसवणूक होते किंवा त्यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद होत राहतात. यामुळे त्यांचे नाते जास्त काळ टिकत नाही.

प्रेमासाठी वाट पहावी लागते
ज्यांचा मुलांक 5 अंक आहे त्या लोकांना कधीकधी खऱ्या प्रेमासाठी खूप वेळ वाट पहावी लागते. 5 क्रमांकाच्या लोकांचे बहुतेक प्रेमसंबंध काही काळ टिकतात. ब्रेकअपनंतर हे लोक लवकरच एका जोडीदाराला सोडून दुसऱ्याकडे जातात. या अंकाच्या काही लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी नसते. काही लोकांचे दोन लग्न होण्याची शक्यता असते.
बुद्धीमत्ता असते प्रखर
मुलांक 5 असलेले लोक खूप हुशार आणि बुद्धिमान असतात. त्यांच्या या गुणामुळे त्यांना व्यवसाय आणि उद्योगात खूप यश मिळते. या क्रमांकाचे लोक नेहमीच जोखीम घेण्यास तयार असतात. हे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा यशस्वी सामना करतात. त्यांच्याशी लढून यश मिळवतात. हे लोक नवीन योजना बनवतात आणि त्यातून मोठा नफा कमावतात. 5 अंकाचे लोक कोणत्याही विषयाची जास्त काळ चिंता करत नाहीत. हे लोक परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतात. या लोकांमध्ये इतरांना संमोहित करण्याचा गुण असतो. हे लोक इतरांशी खूप सहजपणे मैत्री करतात आणि त्यांचे काम त्यांच्याकडून करून घेतात. या क्रमांकाचे लोक उच्च शिक्षण घेतात.