Diwali 2023 : दिवाळीला काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच सर्वजण आतापासूनच तयारीला लागले आहेत. हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्व दिले गेले आहे. तसेच या दिवसांत देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी बरेचजण उपवास करतात. या काळात उपवास तसेच पूजा करून माता लक्ष्मीला प्रसन्न केले जाते.
दरम्यान, धनत्रयोदशीचा शुभ दिवस दिवाळीपूर्वी येतो आणि या दिवशी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दोन देवतांची पूजा केल्याने घरात समृद्धी येते. तसेच आर्थिक अडचणीतून मार्ग निघतात.
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा करण्याबरोबरच काही विशेष उपाय केले तर तुम्हाला आणखीनच चांगले फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींची माहिती देणार आहोत, जर तुम्ही या दिवशी हे उपाय केले तर तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. त्याच वेळी, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ती देखील सोडवली जाईल.
धनत्रयोदशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय !
-हिंदू धर्मात कुबेर देवाला संपत्तीचा देवता म्हंटले गेले आहे, म्हणून कुबेर यंत्र जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवले तर तुम्हाला आयुष्यात कधीच कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
-धार्मिक मान्यतांनुसार तिजोरीत आरसा ठेवल्यास धनाची आवक वाढते. जर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय करू शकता.
-धनत्रयोदशी आणि दिवाळीत जवळपास प्रत्येकजण आपल्या घरात पूजेसाठी चांदीची नाणी ठेवतो. पण जर तुम्ही ते तुमच्या तिजोरीत ठेवले तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीच जाणवणार नाही. या नाण्यावर देवी लक्ष्मीचे चित्र असेल तर ते अधिकच लाभदायक मानले जाते.
-लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लाल आणि सोनेरी रंगाचे कापड शुभ मानले जाते. पैसे आकर्षित करण्यासाठी तुम्ही असे कापड तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. धनत्रयोदशीला हा उपाय खूप प्रभावी ठरेल.
-लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हळद पिवळ्या कपड्यात गुंडाळून धनत्रयोदशीला तिजोरीत ठेवावी. हळद पैसा आकर्षित करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
-लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर तिजोरीत कमळाचे फूल ठेवणे देखील खूप फायद्याचे मानले जाते. तुम्ही हे फूल वेळोवेळी बदलू शकता. धनत्रयोदशीला केलेला हा उपाय तुम्हाला भविष्यात धनवान बनवेल.
टीप : धार्मिक मान्यतांनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी व्यक्तीने तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. या दिवशी आपल्या तिजोरीत रोख रक्कम ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून भविष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये.