Healthy Tips : उन्हाळा वाढलाय काळजी घ्या…! उष्मघाताच्या समस्या टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

Content Team
Published:
Healthy Tips

Healthy Tips : पुण्यासह देशभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उन्हाळ्यात शरीराची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या समस्या देखील वाढल्या आहेत.

उष्माघात ही जास्त तापमानामुळे झालेली एक तीव्र समस्या असते. यामध्ये शरीरात जास्त उष्णता शोषून घेतली जाते. यामुळे रक्तदाब कमी होतो व मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. हा गंभीर आजार असून त्यास त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असते.

उष्माघाताची समस्या जाणवू नये किंवा त्रास होऊ नये यासाठी बाहेर फिरताना डोक्याला कपडा बांधणे किंवा इतर कोणताही कापड डोक्याला बांधणे आवशयक आहे. जेणेकरून त्रीव्र उन्हाचा त्रास होणार नाही. उष्माघातापासून जर तुम्हाला स्वतःची सुरक्षा करायची असेल आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी

-उष्णतेमुळे सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे घामामुळे, घामामुळे शारीवर फोड इत्यादींचा त्रास होतो. या काळात त्वचेचा शुष्कपणा, वाढलेले घामाचे प्रमाण व धूळ यामुळे हे फोड येऊ लागतात. घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी थंड पाण्यानेच अंघोळ करणे महत्वाचे आहे.

-उन्हाळ्यात पातळ व सैल कपडे घालावेत ज्यामुळे घाम कमी येईल आणि घामोळ्यांचा त्रास होणार नाही. अंघोळीनंतर शरीराला टाल्कम पावडर लावावी. तसेच कुठे पुरळ असल्यास त्यावर त्वरित उपाय करावा.

-उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आहारात संत्री, मोसंबी, कलिंगड यांसारख्या रसदार फळांचा समावेश करावा. तसेच हिरव्या पालेभाज्या, गाजर, शेंगदाणे व तृणधान्ये यांचा आहारात समावेश असावा. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन समस्या जाणवत नाही.

-जर तुमचे उन्हात फिरस्तीचे काम असेल तर मीठ साखर पाण्याचे सेवन करावे अथवा लिंबू शरबत देखील घेऊ शकता. जेणे करून थकवा, हातपाय गाळाने असे प्रकार टाळता येतील. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे व निथळणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी सतत बाहेर जात असते. त्यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर, मळमळ, पायात पेटके येणे सहज शक्य आहे. अशावेळी तुम्ही लिबू शरबत पियू शकता.

-उन्हाळयात घश्याला कोरड पडणे ही समस्या सामान्य आहे, असे असले तरीदेखील अत्यंत थंड पाणी पिऊ नये. शरीराच्या तपमानात साजेल असेच पाणी प्यावे.

-उन्हाळ्यात जास्त व्यायाम टाळावा. यामुळे तुम्हाला अनेक समस्या जाणवू शकतात, अशास्थितीत निरोगी राहाल इतकाच व्यायाम रोज करावा.

-तसेच उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी आहारात थोडा बदल करणे गरजेचे आहे. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात अन्न पचावयास जड असते म्हणून उन्हाळ्यात भुकेपेक्षा एक घास कमीच घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe