अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असत. मात्र आजही अनेकजण सर्रास या बाटलीमधून पाणी पितात. मात्र आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक तोटे आहे.
याबाबत आज आपण जाणून घेऊ अनेक प्रकारच्या प्लास्टिकमध्ये बिसफेनोल ए (BPA) हे एक घातक रसायन आहे. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं. त्यामुळे पाण्यासाठी बाटली विकत घेताना ती BPA विरहीत असेल, याकडे लक्ष द्या.
काचेची बाटली उपयुक्त… बहुतेक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA असतं. त्यामुळे काचेची बाटली उपयोगी ठरू शकते. काचेच्या बाटलीत पाणी कितीही दिवस राहू शकतं, मात्र प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते.
प्लॅस्टिक बाटली सूर्यकिरणांपासून दूर ठेवा पाण्याची प्लॅस्टिक बाटली जर उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकतं. कारण सूर्यकिरणांमुळे BPA रसायन पाण्यात तातडीने मिसळलं जातं. त्यामुळे पाण्याची प्लॅस्टिक बाटली वापरणार असाल, तर ती सावलीत ठेवा.
स्वच्छता महत्वाची, नाहीतर… प्लॅस्टिकची बाटली योग्यप्रकारे न धुतल्यास त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते. दुसरीकडे प्लॅस्टिक बाटलीपेक्षा काचेची बाटली स्वच्छ करणं सहज शक्य आहे. लहान मुलांनाही काचेच्याच बाटलीतून दूध पाजणं फायदेशीर आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम