अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. नुकतेच रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकचे युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB) मध्ये विलीनीकरणासाठी मसुदा योजना जाहीर केली आहे.
या मसुद्यानुसार, पीएमसी बँकेची मालमत्ता आणि दायित्वे यूएसएफबीकडे येतील. पीएमसी बँकेतील ठेवी, कर्ज, थकीत कर्ज तसेच पीएमसी बँकेचे उत्पन्न, मालमत्ता, सर्व शाखा यांचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे पूर्ण हस्तांतरण केले जाईल.
ज्यांनी पीएमसी बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडे पुढील हप्ते भरावे लागतील. या व्यवस्थेमुळे पीएमसी बँकेतील सर्व ठेवीदारांच्या सगळ्या ठेवींना संरक्षण मिळेल.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना 1100 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन झाली आहे. साधारणपणे अशा स्वरुपाच्या बँकेच्या स्थापनेसाठी किमान 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाते.
पण युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. यामुळे विलीनीकरणानंतर पीएमसी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवींना (यूएसएफबीमध्ये सुरक्षित संरक्षण मिळणार आहे.
ज्या ग्राहकांचे पैसे PMC बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते 10 वर्षात पूर्ण पैसे परत मिळतील. RBI च्या मसुद्याच्या योजनेनुसार, USF बँक ठेवीदारांना 5 लाख रुपयांची हमी रक्कम देईल.
त्यानंतर, बँक दोन वर्षांनी 50,000 रुपये, तीन वर्षांनी 1 लाख रुपये, चार वर्षांनी 3 लाख रुपये, 5 वर्षांनी 5.5 लाख रुपये आणि 10 वर्षांनी संपूर्ण रक्कम देईल.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड हा सेंट्रम ग्रुप आणि भारतपे यांचा संयुक्त उपक्रम आहे. बँकेने 1 नोव्हेंबर 2021 रोजी स्मॉल फायनान्स बँक म्हणून कामकाज सुरू केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम