Guru Shukra Yuti : गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे उजळेल ‘या’ 5 राशींचे भाग्य, होईल आर्थिक लाभ!

Published on -

Guru Shukra Yuti : ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र बलवान असतात, त्यांना सुख, समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्याची कमतरता नसते. अशातच तब्बल 12 वर्षांनंतर देवांचा गुरू बृहस्पति आणि राक्षसांचा गुरू शुक्र यांची भेट होणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे.

सध्या गुरू-शुक्र, वृषभ राशीत स्थित आहे. 19 मे पासून शुक्र मेष राशीतून बाहेर पडून स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. गुरू आणि शुक्र यांच्या संयोगाने पाच राशींना सर्वाधिक फायदा होईल. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी गुरू आणि शुक्राचा संयोग वरदान ठरेल. या काळात यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मी आशीर्वाद देईल. भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळेल. नोकरदारांना बढती मिळू शकते.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहांचा हा संयोग खूप शुभ राहील. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुरू आणि शुक्राचा संयोग करिअरसाठीही शुभ राहील.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठीही ग्रहांचा हा संयोग शुभ राहील. या काळात उत्पन्न वाढू शकते. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. व्यवसायासाठीही हा काळ शुभ राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनाही ग्रहांच्या या मिलनाचा फायदा होणार आहे. या काळात नशिबाची साठी मिळेल. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीसारख्या बातम्या मिळू शकतात.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी बृहस्पति आणि शुक्राचा संयोग फायदेशीर ठरेल. करिअर संदर्भात चांगली बातमी मिळेल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याचाही फायदा होईल. एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe