Epilepsy Information in Marathi : रात्री उशिरापर्यंत रील्स, वेब सिरीज पाहणाऱ्यांमध्ये वाढत चाललेल्या या आजाराबद्दल जाणून घ्या व सावध व्हा

Ahmednagarlive24 office
Published:

आजकाल मोबाईल, संगणक आदींचा उपयोग कामापेक्षा करमणुकीसाठी देखील जास्त प्रमाणात वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर रील्स, वेबसिरीज पाहणे अथवा गेम्स खेळणे असे प्रकार सध्या केला जात आहेत.

अनेकांना हे खेळण्याचे व्यसनच जणू जडले आहे. तासनतास मोबाइलमध्ये घालविल्यामुळे पुरेशी झोप होत नाही. यातून तणाव वाढतो. कालांतराने झोपेचा प्रयत्न केला तरी झोप लागत नाही.

अशा स्थितीत एपिलेप्सी अर्थात अपस्मार हा अजार होण्याचा धोका बळावतो. या आजारामुळे मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात व या मुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो असे म्हटले जाते.

हातपायांना मुंग्या येतात, मानसिक संतुलन बिघडते आदी स्वरूपाचा त्रास वाढतो. हा टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित एक जुना आजार आहे.

या आजाराचे वेगवेगळी लक्षणे आहेत. वेळीच उपचार घेतले तर हा आजार औषधांनी बर होतो. अन्यथा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. धावपळीचे जीवन, वाढता तणाव, व्यसन, असंतुलित आहार यासह रात्री उशिरापर्यंत जागणे आदी कारणांमुळे या आजारांचा धोका वाढतो. कोणत्याही वयोगटातील रुग्णाला हा आजार होऊ शकतो.

एपिलेप्सी आहे तरी काय ?:-
एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून याने मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात. ज्यामुळे रुग्णाची शुद्ध हरपते, फिट येते, मूड बदलणे आदी स्वरूपाचे लक्षणे दिसतात.

असे सांभाळा स्वतःला

  • दररोज पुरेशी झोप घ्यावी.
  • नियमित व्यायाम करावा.
  • व्यसनापासून दूर राहावे.
  • संतुलित आहार घ्यावा.
  • तणाव व्यवस्थापन
  • टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटर पाहणे कमी करावे

या सवयी पडतील महागात :-
रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहणे ही अतिशय घातक सवय आहे. यामुळे पुरेशी झोप होत नाही. यामुळे पोटाचे विकार वाढतात, तणाव निर्माण होतो, डोळे जळजळ करतात.

किमान सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आते. बहुतांशी जण मात्र विविध कारणांमुळे पुरेशी झोप घेत नसल्याने त्यांना शारीरिक व मानसिक आजारांचा सामना करावा लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe