Eye Health : तुमचे पण डोळे खराब झाले आहेत का, तुम्हाला पण अंधुक दिसतं का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरू शकते. कारण की, आज आपण नजर कमी झाली असेल तर कोणते सोपे आणि नैसर्गिक उपाय केले जाऊ शकतात ज्यामुळे गेलेली नजर परत येईल याबाबत माहिती पाहणार आहोत.
अलीकडे आपली जीवनशैली भारत व्यस्त झाली आहे. पूर्वी लोकांचे जीवनशैली फारच शिस्तबद्ध होते आणि संतुलित आहाराचा समावेश होत होता यामुळे लोकांची दृष्टी देखील चांगली राहत होती. अलीकडे मात्र निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहाराचा फार अभाव दिसतोय अन याचा दृष्टीवर गंभीर परिणाम होतोय.

तज्ज्ञांचे पण असंच म्हणणे आहे. बदलत्या जीवनशैलीत टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर अशा उपकरणांचा वापर वाढलेला आहे. पण या उपकरणाच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतोय. या कारणांमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ, थकवा आणि धूसर दृष्टी यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत.
डिजिटल स्क्रीनमधून निळ्या प्रकाशाचा सतत होणारा संपर्क रेटिनावर परिणाम करतो आणि परिणामी दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो. त्यातच झोपेची कमतरता, अपुर पाणीसेवन आणि आवश्यक पोषक तत्त्वांचा अभाव ही सुद्धा काही प्रमुख कारणे आहेत ज्याने दृष्टी अधिकच कमकुवत बनत चाललीय.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स अत्यावश्यक आहेत. विशेष म्हणजे ही सर्व पोषक घटक आपल्याला नैसर्गिकरीत्या सुद्धा मिळू शकतात.
हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारी गाजरे ही या पोषक तत्त्वांसाठी उत्तम स्रोत मानली जातात. युटाह विद्यापीठाच्या अभ्यासातुन पण ही गोष्ट समोर आली आहे. तज्ञ सांगतात की गाजरांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले बीटा-कॅरोटीन शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते.
हे व्हिटॅमिन रेटिनाच्या कार्यासाठी तसेच रात्रीच्या दृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बीटा-कॅरोटीनमुळे रेटिनामधील रोडोप्सिन हे प्रथिन मजबूत होते, जे कमी प्रकाशात स्पष्ट दिसण्यासाठी मदत करते.
याशिवाय गाजरामधील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम डोळ्यांतील रक्तप्रवाह सुधारतात आणि जळजळ कमी करतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नियमित गाजराचे सेवन कोरडे डोळे, लालसरपणा आणि सौम्य अॅलर्जी कमी करण्यातही मदत करते.
आल्यामध्ये असलेले दाहक-विरोधी घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि हंगामी डोळ्यांच्या संसर्गापासून संरक्षण करतात. तज्ज्ञांचा सल्ला आहे की रोजच्या आहारात सॅलेड, सूप किंवा ज्यूसच्या स्वरूपात गाजराचा समावेश करावा.
गाजर आणि आल्याचा ताजा रस हिवाळ्यात सेवन केल्यास डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिरिक्त लाभ मिळू शकतो. योग्य आहार, पुरेशी झोप आणि स्क्रीन ब्रेक यांसह या नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास दृष्टी दीर्घकाळ निरोगी राहू शकते.
म्हणजेच आठवड्यातून एकदा तुम्ही गाजराचा रस पिला तरी देखील तुमची नजर चांगली राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पण तुमची नजर चांगली ठेवायची असेल, डोळे अगदीच घारीसारखे तीक्ष्ण बनवायचे असतील तर तुम्ही सुद्धा गाजराचा रस प्यायला हवा.













