Fake Almonds : थांबा ! तुम्ही देखील बनावट बदाम खात आहात का?; जाणून घ्या कसे ओळखायचे

Published on -

How to Identify Fake Almonds : आजकाल बाजारात सर्व प्रकारच्या भेसळयुक्त मालाची बिनदिक्कतपणे विक्री केली जात आहे. अधिक नफा मिळविण्यासाठी लोक अशी भेसळ आणि काळाबाजार करत आहेत. भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकतात. असे पदार्थ खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो. एवढेच नाही तर मधुमेह, कॅन्सर आणि पोटाशी संबंधित घातक आजारही भेसळयुक्त वस्तूंच्या सेवनामुळे होतात.

विशेषतः सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांची जास्त विक्री होते. सणासुदीच्या काळात सर्वात जास्त सुक्या मेव्यामध्ये जास्त भेसळ पाहायला मिळते. अनेक वेळा सरकारी एजन्सी बाजारात बनावट बदाम, काजू इत्यादींची खेप पकडतात. या गोष्टींमध्ये अशा प्रकारे भेसळ केली जाते की सहज ओळखणे कठीण जाते. खऱ्या आणि नकली बदामांमध्ये फरक कसा करायचा आणि नकली बदाम खाल्ल्याने आरोग्याला होणाऱ्या हानीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

बनावट बदाम कसे ओळखावे?

बाजारातून बदाम विकत घेताना, काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा या गोष्टींमध्ये भेसळ अशा प्रकारे केली जाते की ती हुबेहुब मूळ दिसायला लागते. पण काही टिप्सचा वापर करून तुम्ही खऱ्या आणि नकली बदामांमध्ये फरक करू शकता. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) देखील खरी आणि बनावट खाद्य उत्पादने ओळखण्यासाठी वेळोवेळी काही टिप्स जारी करते.

खरे आणि नकली बदाम ओळखण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा !

1. खरे आणि नकली बदाम ओळखण्यासाठी ते तुमच्या तळहातावर घासून घ्या. बदामाला चोळताना त्याचा रंग निघत असेल तर तो बनावट आणि भेसळ आहे हे समजून घ्या. त्याचा रंग निघाला की ते बदाम बनावट आहेत समजून जा.

2. तुम्ही बदामाच्या रंगावरूनही ते ओळखू शकता. खऱ्या बदामाचा रंग हलका तपकिरी असतो, तर नकली बदामाचा रंग गडद दिसतो.

3. खरे आणि नकली बदाम ओळखण्यासाठी, काही वेळ कागदावर दाबून ठेवा. असे केल्याने कागदावर तेलाच्या खुणा दिसत असतील तर बदाम खरे आहेत.

याशिवाय खऱ्या आणि नकली बदामांच्या पॅकिंगवरूनही ओळखता येते. ते खरेदी करताना पॅकिंगवर लिहिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा. अनेक वेळा भेसळ करणारे ब्रँडचे पॅकिंग कॉपी करून बाजारात विकतात. ते सहज ओळखता येते. नकली बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीराला पोषण तर मिळत नाहीच, पण त्यांचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. जास्त काळ भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने कर्करोगासारखे आजारही होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe