Friday OTT Release : हा विकेंड मनोरंजनाचा डबल डोस घेऊन आला आहे. या वीकेंडच्या पार्श्वभूमीवर 3 मोठ्या मूव्हीज आणि वेब सिरीज रिलीज झाल्या आहेत. आज 14 नोव्हेंबर रोजी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या वेब सिरीज आणि मुव्हीज रिलीज झाल्या आहेत.
आज कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलरच्या ओव्हरडोजने परिपूर्ण अशा वेबसिरीज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यामुळे हा वीकेंड तुम्हाला तुमच्या परिवारासमवेत मजेत घालवता येणार आहे.

नवा आठवडा सुरू होण्याआधी तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत अनेक मजेदार चित्रपट आणि सीरिजचा एन्जॉय घेऊ शकता. आता आपण आज कोणकोणते चित्रपट आणि सीरिज रिलीज झाल्या आहेत याची माहिती पाहणार आहोत.
आज रिलीज झालेले चित्रपट आणि वेब सिरीज
जुरासिक वर्ल्ड रीबर्थ : आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सादर झाला आहे. OTT प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टार वर हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.
जुरासिक वर्ल्ड डोमिनियन या 2022 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वेल जुरासिक वर्ल्ड रीबर्थ ओटीटी वर येणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत्या आणि आज अखेर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.
हा अॅक्शन अॅडव्हेंचर सायन्स-फिक्शन चित्रपट आहे. यात स्कारलेट जोहानसन, जोनाथन बेली आणि महेरशला अली अशी तगडी स्टारकास्ट आहे.
इंस्पेक्शन बंगला : हॉरर कॉमेडी ड्रामा चित्रपट अलीकडे फारच गाजतायेत. स्त्री, भेडिया असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस खरे उतरले आहेत. दरम्यान आज जी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘इंस्पेक्शन बंगला’ हा हॉरर-कॉमेडी ड्रामा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.
यात विष्णु नामक एका पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट आहे. या चित्रपटात कॉमेडी सोबतच हॉररचा तडका आहे. यामुळे जर तुम्हालाही अशा जॉनरचे चित्रपट पाहायला आवडत असतील तर ही तुमच्यासाठी एक खास मेजवानी ठरणार आहे.
कम सी मी इन द गुड लाइट : आज 14 नोव्हेंबर रोजी एक खास डॉक्युमेंटरी पण रिलीज झाली आहे. कम सी मी इन द गुड लाइट ही इमोशनल डॉक्युमेंटरी आज रिलीज करण्यात आली आहे.
या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन यान व्हाइट यांनी केले आहे. यात लव्हस्टोरी, संघर्ष अशा सर्व गोष्टीं दिसतात. ही डॉक्युमेंटरी ओटीटी प्लॅटफॉर्म एप्पल टीव्हीवर रिलीज करण्यात आली आहे.












