Fridge Temperature Tips : थंडीच्या दिवसांत फ्रिजचे तापमान किती असावे? जाणून घ्या अचूक उत्तर, अन्यथा…

Fridge Temperature Tips : देशात सध्या हिवाळा सुरु आहे. अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र अनेकजण थंडीच्या दिवसांत फ्रिज करत असताना काही चुका करत असतात. त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र इतर नुकसानीला देखील सामोरे जावे लागते.

फ्रिजचे तापमान हे प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळे ठेवावे लागते. मात्र फ्रीजचा वापर करताना अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत फ्रिजचे तापमान योग्य असणे आवश्यक असते.

बदलत्या हवामानानुसार फ्रिजचे तापमान हे बदलले पाहिजे अन्यथा तुमचे फ्रिजमधील पदार्थ आणि भाजीपाला खराब होऊ शकतो. तसेच वीजबिल जास्त येऊन तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

बदलत्या काळानुसार प्रत्येकाच्या घरात फ्रिज पाहायला मिळत आहे. फ्रिजमुळे घरातील भाजीपाला आणि इतर पदार्थ ताजे राहतात. मात्र फ्रिजचे तापमान योग्यरीत्या सेट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही बदलत्या हवामानानुसार फ्रिजचे तापमान योग्यरित्या ठेवले नाही तर तुमचे पदार्थ आणि भाजीपाला खराब होऊ शकतो.

फ्रिजचे तापमान सेट करण्यासाठी काही नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसार फ्रिजचे तापमान ठेवणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या कंपनीचे फ्रिज आहेत. त्यामुळे तापमान सेट करण्यासाठी वेगवेगळी पद्धत त्यामध्ये उपलब्ध असते.

फ्रिजच्या रेग्युलेटरमध्ये वेगवेगळ्या ऋतूसाठी वेगवेगळे मोड दिलेले असतात. त्यामुळे त्या मोडनुसार प्रत्येक ऋतूत फ्रिजचे तापमान त्यानुसार ठेवले पाहिजे. जर तुम्ही फ्रिजचे तापमान योग्य ठेवले नाही तर तुमचे अनेक प्रकारचे नसून होऊ शकते.

सध्या भारतात थंडीचे दिवस सुरु आहेत. अशा काळात फ्रिजचे तापमान अगदी योग्य ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या घरात फ्रिज असेल तर थंडीच्या दिवसांत फ्रिजचे तापमान 1.7 ते 3.3 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवणे कधीही फायदेशीर मानले जाते. तुम्ही थंडीच्या दिवसांत फ्रिजचे तापमान 1.7 ते 3.3 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवले तर तुमचे पदार्थ आणि भाजीपाला ताजा राहू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe