Fruits To Boost Immunity : हवामानात बदल होताच बरेचजण आजारी पडू लागतात, असे का होते माहीत आहे का? पण ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते ते लोकं लवकर आजारी पडतात. वातावरणात बदल होताच या लोकांना सर्दी, खोकला, यांसारख्या समस्यांना समोरे जावे लागते, अशातच जर तुम्हालाही हंगामी आजार टाळायचे असतील, तर तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे फार गरजेचे आहे, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. आजच्या या लेखात आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
इम्युनिटी वाढवण्याची आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा :-
सफरचंद
असे म्हणतात की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही जास्त आजारी पडत नाही. याचा अर्थ असा की रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते, रोग कमी होतात आणि मौसमी तापाशी लढण्याची तुमची शारीरिक क्षमताही वाढते. सफरचंदमध्ये नैसर्गिकरित्या अँटिऑक्सिडेंट असतात, ते जीवनसत्त्वे आणि खनिजांचा देखील चांगला स्रोत आहे आणि त्यात फायबर देखील आढळते. हे सर्व घटक आपल्याला जंतू आणि रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
संत्री
संत्री व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्रा हे एक उत्तम फळ मानले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजेपैकी 70 टक्के व्हिटॅमिन सी एका संत्र्यापासून मिळू शकते. त्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे मौसमी आजारांना दूर ठेवतात, मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात आणि सर्दीपासून बचाव करतात.
द्राक्षे
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही द्राक्षेही खाऊ शकता. द्राक्षे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत मानली जातात. शिवाय, द्राक्षे ही पाण्याने भरलेली फळे आहेत. त्यामुळे याच्या सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही, शरीर हायड्रेट राहते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि तुम्हाला संक्रमणाशी लढण्यासाठी तयार करते.
ब्लूबेरी
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्लूबेरीचाही समावेश करू शकता. हे देखील सर्वोत्तम आणि चवदार फळांपैकी एक आहे. त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात, जे एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट असतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि पेशींचे नुकसान टाळते. इतकंच नाही तर पोट स्वच्छ ठेवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. कोणीही त्याचे सेवन करू शकतो.
किवी
अनेक आरोग्य अभ्यासक देखील किवीला पौष्टिक फळ मानतात. मौसमी आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही किवीचे सेवन करू शकता. हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्यात जीवनसत्त्वेही मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, ते आजारी पडण्याचा धोका कमी करते, तसेच ते पचन सुधारण्यास देखील मदत करते.