Garuda Purana : गरुड पुराण एक महान पुराण असून या पुराणामध्ये जीवन चांगले जगण्यापासून ते मृत्यूपर्यंत तसेच नंतरच्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. असे मानतात की भगवान विष्णूंकडून स्वतः या पुराणात सांगण्यात आलेल्या गोष्टी त्यांच्या वाहन गरुडाला सांगितल्या आहेत.
या पुराणामध्ये गरिबीचे कारण सांगितले आहेत. जर तुम्हाला काही वाईट सवयी असतील तर त्या आजच टाळा. नाहीतर तुम्हालाही गरिबीचा सामना करावा लागतो. कोणत्या आहेत या पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या.
या 5 चुकांमुळे येते दारिद्र्य
उशिरा झोपणे
ज्यांना उशिरा झोपण्याची सवय असते त्यांच्यावर माता लक्ष्मी रागावते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला गरिबीचा सामना करावा लागतो. गरुड पुराणानुसार, ब्रह्म मुहूर्तात सकाळी लवकरात लवकर उठावे. जे लोक सकाळी सूर्योदयापूर्वी उठतात त्यांना पैशाची कमतरता जाणवत नाही.
लोभी वृत्ती असणे
ज्या लोकांची वृत्ती लोभी स्वभावाचे असते त्यांना आयुष्यात कधीही सुखी राहता येत नाही. त्यामुळे त्यांनी लोभापासून शक्यतो दूर राहणे गरजेचे आहे. जो लोभी असतो तो चुकीच्या मार्गाने पैसा कमावत असतो त्यामुळे तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही.
कठोर परिश्रम
अनेकांना कसलीच मेहनत करायला आवडत नाही. बऱ्याचदा काही जण कष्ट करणे टाळतात. त्यामुळे लक्ष्मी त्यांच्या पाठीशी उभी राहत नाही. त्यामुळे तुम्ही कष्ट करून पैसा कमवावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कष्टाने कमवलेला पैसा कधीही संपत नाही.
पैशाची बढाई
बऱ्याच वेळा माणसाला जास्तीत जास्त पैसे मिळाले की तो पैशाची बढाई मारू लागतो. परंतु जर तुम्ही पैशाचा अभिमान बाळगला तर तुमचे नुकसान होते. पैशाचा अभिमान असला की एखादी व्यक्ती इतर लोकांना भेटणे कमी करते. त्यांच्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. समजा तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही गरजूंना पैसे द्यावे.
घाणेरडे कपडे टाळा
गरुड पुराणामध्ये घाणेरडे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण घाणेरडे कपडे घालणार्याच्या घरात माता लक्ष्मीचा वास नसतो. त्यामुळे आपले कपडे आणि शरीर नेहमी स्वच्छ ठेवा.