Credit Card Offers : फेस्टिव्हल सिजनमध्ये ‘या’ पद्धतींद्वारे जास्तीत जास्त Credit Card Reward मिळवा, खरेदीसह होईल मोठी बचत

Ahmednagarlive24 office
Published:
Credit Card Offers

Credit Card Offers : सणासुदीच्या काळात लोक भरपूर खरेदी करतात. या काळात कुणालाही सर्वोत्तम जे आहे तेच घ्यायला आवडतं. म्हणजे कमीत कमी किमतीत चांगल्या गोष्टी कशा मिळू शकतात हे अनेकजण पाहतात. यात जर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स आणि कूपन व्हाउचर देखील मिळाले तर ते किती भारी होईल ना?

रिवॉर्ड पॉईंट्स आणि कूपन व्हाउचर्सबद्दल बोलायचे झाले तर क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्स, रिवॉर्ड पॉईंट्स आणि कूपन व्हाउचर उपलब्ध आहेत. तर आज आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत की जर तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवर जास्तीत जास्त रिवार्ड्स हवी असतील तर तुम्ही ती कशी मिळवू शकता. चला जाणून घेऊयात –

* योग्य कार्ड निवडा

सध्या अनेक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक क्रेडिट कार्ड ऑफर्स घेऊन येतात. या ऑफरमध्ये किंवा अनेक क्रेडिट कार्ड पर्यायांत तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वत:साठी योग्य क्रेडिट कार्ड निवडणे. योग्य क्रेडिट कार्ड निवडताना, आपली खर्च करण्याची पद्धत आणि आपण सर्वात जास्त कुठे खर्च करता हे समजून घ्या कारण वेगवेगळे क्रेडिट कार्ड आपल्याला वेगवेगळ्या ऑफर देतात. समजा तुम्ही खूप ट्रॅव्हल करणारे व्यक्ती असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला असे क्रेडिट कार्ड मिळू शकते जे तुम्हाला प्रवासावर अधिक ऑफर्स देऊ शकते. शिवाय जर तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी क्रेडिट कार्ड पेमेंट करत असाल तर रुपे क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. आपण रुपे क्रेडिट कार्डद्वारे यूपीआयचा लाभ देखील घेऊ शकता.

वेलकम बोनसचा लाभ घ्या

– जेव्हाही आपल्याला नवीन क्रेडिट कार्ड मिळते तेव्हा आपल्याला बरेच वेलकम बोनस दिले जातात. त्यांची ऑफर संपण्यापूर्वी आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे.

– बऱ्याचदा जेव्हा आपण क्रेडिट कार्ड खाते उघडता तेव्हा स्वागत बोनस मिळतात ज्यामुळे आपल्याला अनेक रिवार्डस मिळण्यास मदत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe