Numerology : प्रत्येक व्यक्तीचे जीवन आणि व्यक्तिमत्त्व त्याच्या राशीनुसार जाणून घेता येते. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा उल्लेख आहे. या राशिचक्राची चिन्हे ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर आधारित व्यक्तीच्या जीवनाबद्दल सर्व काही सांगतात.
ज्योतिषशास्त्र अनेक शाखांमध्ये विभागलेले आहे. यापैकी एक शाखा म्हणजे संख्याशास्त्र, ज्यामध्ये संख्यांच्या आधारे व्यक्तीबद्दल सर्वकाही जाणून घेता येता. संख्याशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून एक संख्या शोधली जाते तिला मूलांक संख्या असे म्हणतात, जन्मतारखेची बेरीज करून ही संख्या काढली जाते.
आज आपण अशा काही खास तारखांना जन्मलेल्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपल्या पती आणि इतर लोकांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे चांगले माहित असते.
मूलांक 2
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 2 असते. या तारखांना जन्मलेल्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो. या व्यक्तींचे व्यक्तिमहत्व कसे असते जाणून घेऊया…
-या मूलांकावर चंद्राचा प्रभाव असल्याने अशा मुली ग्लॅमरशी संबंधित आहेत.
-या मुलींना चंद्र आकर्षक बनवतो. त्याच वेळी, या तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये शुक्राची शक्ती देखील दिसून येते.
-2 तारखेला जन्मलेल्या मुलींबद्दल असे म्हटले जाते की त्यांना कोणतीही मेहनत न करता सहज प्रसिद्धी मिळते.
-या तारखेला जन्मलेल्या मुली खूप सुंदर असतात. तसेच त्या आपल्या सौंदर्याने कोणाचेही मन जिंकतात.
-प्रेम आणि सौंदर्याच्या बाबतीत या मुली पुढे असतात. या मुलींना कोणाला कसे मोहित करावे हे माहित असते.