अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- Girls Secrets : तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना, तुमच्या जोडीदाराची आठवण आल्यावर थोडं दु:खी होणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत ते दुःख वेगवेगळ्या रूपात समोर येते. तुम्हाला माहित आहे का की मुली जेव्हा त्यांच्या पार्टनरला मिस करतात तेव्हा काय करतात?
बोलण्यासाठी निमित्त शोधत असतात :- काही कारणास्तव जोडीदारापासून अनेक दिवस लांब राहिले कि , मुली त्यांच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधू लागतात. त्या त्यांच्या जोडीदाराला वारंवार मेसेज करतात आणि मध्येच फोन करून प्रियकराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या चॅटिंग आणि कॉलिंग दीर्घकाळ चालू ठेवायचे असते आणि त्या त्यांच्या मनातील सर्व गोष्टी त्यांच्या जोडीदाराला सांगू इच्छितात.

रोमान्सची स्वप्ने पाहतात :- प्रेमात रोमान्स असणे स्वाभाविक आहे. जेव्हा पार्टनर दूर असतो तेव्हा मुलींना त्याची खूप आठवण येते आणि त्या त्याच्यासोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त करू लागतात. त्या त्यांच्या जोडीदारासोबत रोमँटिक सुट्टीचे स्वप्न पाहतात आणि त्यांच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस किंवा त्यांच्या एनिवर्सरीचे नियोजन करण्यास सुरुवात करतात. त्या जोडीदाराला रोमँटिक मेसेज पाठवून अशी योजना करायला प्रेरित करतात.
सोशल मीडियावर लक्ष ठेवा :- जोडीदाराने विनाकारण बोलणे कमी केले किंवा थांबवले तर मुलींचा संशय अधिकच बळावतो. त्या लगेच त्याचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासू लागतात. प्रत्येक साइट रिफ्रेश करण्यासोबतच त्या जोडीदाराचे लास्ट सीन ऑन व्हॉट्सअॅप आणि डीपी (डिस्प्ले पिक्चर) पुन्हा पुन्हा पाहत राहतात. मुलींना त्यांचे फोटो पाहूनही आराम वाटतो.
भविष्यातील योजना बनवतात :- मुली मनानी स्वच्छ असतात. त्या कोणावरही मनापासून प्रेम करतात. जेव्हा जोडीदार दूर असतो तेव्हा त्यांना त्याच्याबद्दल विचार करून वाईट वाटू लागते. यासोबतच त्या आपल्या मनात प्लॅन्सही बनवू लागतात की भेटल्यावर नातं कसं पुढे नेणार.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम