गोव्याला पिकनिकला जाणार आहात का ? मग ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, वाचा सविस्तर

Published on -

Goa Best Destination : पावसाळा अंतिम टप्प्यात आला आहे आणि म्हणूनच अनेक जण आता पिकनिकच्या प्लॅनमध्ये आहेत. नवरात्र उत्सवात तसेच दिवाळीतही अनेक जण पिकनिकला बाहेर पडणार आहेत.

दरम्यान जर तुमचाही येत्या सणासुदीच्या दिवसांमध्ये बाहेर पिकनिकला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण गोव्यातील काही लोकप्रिय ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत.

खरे तर पिकनिकचा विषय निघाला की गोव्याचे नाव आपसूक आपल्या ओठांवर येते. गोवा हे एक हॉट फेवरेट पिकनिक डेस्टिनेशन म्हणून उदयास आले आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर आधारित आहे.

गोव्याची नाईटलाइफ आणि येथील नैसर्गिक सौंदर्यता पर्यटकांना भुरळ घालते. पण जर तुम्ही गोव्याला जाणार असाल तर तिथे नेमकी कोणती ठिकाणी पाहायला हवीत? याबाबत आता आपण माहिती पाहूयात.

दूध सागर धबधबा – दक्षिण गोव्यातील हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालते. जो गोव्याला जातो तो इथे आवर्जून जातो. येथे दरवर्षी पर्यटकांची रेलचेल असते. पावसाळ्याच्या दिवसात येथे पर्यटकांची अधिक गर्दी पाहायला मिळते. एक हजार फूटवरून हा धबधबा खाली जमिनीवर कोसळतो.

अगोंडा बीच – गोवा म्हणजे बीचेस. इथे गेल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर जावेच लागते. गोव्याची खरी सुंदरता तुम्हाला बीचेसवरच दिसणार आहे. गोव्यात छोटी मोठी असंख्य बीच आहेत. अगोंडा हा देखील गोव्यातील एक विस्तृत आणि लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.

सायंकाळी या बीचवर बसून सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच आहे. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत इथे जाऊ शकता. पार्टी करायची असेल तर मित्रांसोबतही तुम्ही येथे आवर्जून जायला हवे.

अवर लेडी ऑफ रेमेडिओज चर्च – गोव्याला गेला तर इथे एकदा नक्की भेट द्या. नाताळ सारख्या काही खास प्रसंगी या चर्चेची सुंदरता आणखी वाढते. हे गोव्यातील सर्वाधिक जुने चर्च आहे. 

पालोलेम बीच – या समुद्रकिनाऱ्याची आपली एक सुंदरता आहे. येथे गेल्यानंतर तुम्हाला शांत व अगदीच उत्साही वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. गोव्यात गेल्यानंतर तुम्हाला पार्टी करायची असेल तर तुम्ही इथे आवर्जून जा. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News