Gold price update :- सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
आता सोने 271 रुपयांनी स्वस्त झाले असून, त्याचा नवा दर 46887 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदी 687 रुपयांनी स्वस्त झाली. चांदीचा नवा दर 63210 रुपये प्रतिकिलो आहे.

गुरुवारी सोन्याचा दर 47158 रुपये, तर चांदीचा दर 63897 रुपये होता. डॉलरच्या मजबुतीमुळे सोने-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, आर्थिक हालचालींमध्ये जोरदार वाढ आणि ग्राहकांच्या मागणीत सुधारणा झाल्यामुळे जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी वार्षिक 47 टक्क्यांनी वाढून 139.1 टन झाली.
हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही.
तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.
सोन्याची शुद्धता अशी ओळखा
२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.