Gold Price Update : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धाचा (War) परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे कच्चे तेल देखील महागले आहे. तसेच सोन्या चांदीचे देखील दरांमध्ये मोठी वाढ सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
सोन्या (Gold) -चांदीच्या (Silver) दरातील घसरणीचा कालावधी २४ तास टिकला. आज पुन्हा भाव वाढले. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या स्थितीवर चर्चेदरम्यान मौल्यवान धातूंमध्ये अस्थिरता कायम आहे.

काल सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाल्यानंतर आजही भावात तेजी राहिली. सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 250 रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीचा भाव किलोमागे 400 रुपयांनी वाढला. आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 53 हजार 900 रुपये होता. गुंतवणूकदार आणि औद्योगिक मागणी कमजोर राहिली.
आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच जयपूरच्या सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागणीचा दबाव सामान्य राहिला.
जयपूर सराफा समितीने जाहीर केलेल्या किमतींनुसार सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 100 ते 250 रुपयांनी वाढ झाली आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर 53,900 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला. त्याचवेळी सोन्याचे दागिने 50,800 रुपये, सोन्याचे 18 कॅरेट 42,500 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. सोने 14 कॅरेट प्रति दहा ग्रॅम 34,500 रुपये होते.
चांदीच्या दरात किलोमागे 400 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 71 हजार 400 रुपये प्रतिकिलो राहिला. युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे बाजारात गुंतवणूकदार आणि खरेदीदार अनुपस्थित आहेत.