देशात सोन्याची किंमत आता पुन्हा वाढू लागली आहे,गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत बरेच चढउतार पाहायला मिळायला आहेत.(Gold-Silver Price Today)
सोने सध्या गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. जाणकरांच्या सल्ल्यानुसार सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे.
दरम्यान ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 0.14 टक्क्यांनी वाढून 46,892 रुपये प्रतितोळा या पातळीवर पोहोचली. तर चांदीच्या दरात 0.48 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो 60,963 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे.
पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.
पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.
भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे आजचे दर
City 22 Carat Gold Today 24 Carat Gold
Chennai ₹44,130 ₹48,140
Mumbai ₹45,910 ₹46,910
Delhi ₹45,960 ₹50,140
Kolkata ₹46,310 ₹49,010
Bangalore ₹43,900 ₹47,890
Hyderabad ₹43,900 ₹47,890
Kerala ₹43,900 ₹47,890
Pune ₹45,060 ₹46,890
Vadodara ₹45,560 ₹48,040
Ahmedabad ₹44,990 ₹48,090
Jaipur ₹45,810 ₹48,180
Lucknow ₹44,610 ₹47,410
Coimbatore ₹44,130 ₹48,140
Madurai ₹44,130 ₹48,140
Vijayawada ₹43,900 ₹47,890
Patna ₹45,060 ₹46,890
Nagpur ₹45,910 ₹46,910
Chandigarh ₹44,610 ₹47,410
Surat ₹44,990 ₹48,090
Bhubaneswar ₹43,920 ₹48,710
Mangalore ₹43,900 ₹47,890
Visakhapatnam ₹43,900 ₹47,890
Nashik ₹45,060 ₹46,890
Mysore ₹43,900 ₹47,890
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.