Reliance Jio : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन प्लॅन घेऊन येत आहे. हाय स्पीड कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या जिओ फायबर सेवेचा वापर आता लाखो युजर्स भारतात करत आहेत. विशेष म्हणजे जिओचा लाँग टर्म प्लॅन रिचार्ज केल्यास तुम्हाला 1 महिन्यासाठी फ्री वाय-फाय सेवेचा अॅक्सेस दिला जात आहे. इतकंच नाही तर युजर्संना फ्री वायफाय इन्स्टॉलेशनचा पर्यायही दिला जातो.
चला सविस्तर जाणून घेऊयात –

* 30 दिवसांसाठी मिळणार मोफत वाय-फाय
जर तुम्ही जिओ फायबर युजर असाल किंवा नवीन कनेक्शन घेत असाल तर कंपनी आता तुम्हाला 30 दिवसांसाठी फ्री हायस्पीड इंटरनेट देत आहे. जर तुम्ही तुमचा कोणताही वायफाय प्लॅन 12 महिन्यांसाठी रिचार्ज केला तर तुम्हाला 1 महिन्यासाठी त्याच प्लॅनचे फायदे पूर्णपणे मोफत दिले जातील.
म्हणजेच रिचार्जचा फायदा 12 महिन्यांऐवजी 13 महिन्यांसाठी दिला जाणार आहे. हाच प्लॅन 6 महिन्यांसाठी तुम्ही रिचार्ज केला तर तुम्हाला 15 दिवसांसाठी फ्री कनेक्टिव्हिटी दिली जाईल. 6 महिन्यांनंतरही पुढील 15 दिवस तुम्हाला या योजनेचा लाभ फ्री मिळत राहील.
त्याचबरोबर जिओचे असे अनेक प्लॅन आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात तुम्हाला अधिक वैधतेसह अनेक युनिक बेनिफिट्स दिले जातात. जर तुम्हाला आता प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत साईटवर जाऊन तुमच्या आवडीनुसार किंवा त्याच्या फायद्यांनुसार कोणताही प्लॅन निवडू शकता.