गोरो गोरी पान फुलासारखी छान..!! १० पैकी ९ मुलांना गोरीच मुलगी पाहिजे, कमावणारी असेल तर सावळीही चालते..पहा मॅट्रिमोनियल साइट्सचे निष्कर्ष

आजकाल लग्न म्हटलं मुलगा व मुलगी यांचीच पसंती महत्वाची. पूर्वी घरातील मोठी मंडळी लग्न जमवायची मुलांची मते विचारात घेतली जात नसत. पण आता प्रायोरिटी मुलगा व मुलीची असते. मुलींच्याही मताला आता महत्वाचे स्थान आहे.

दरम्यान आपण बऱ्याचदा म्हणतो की आजच्या आधुनिक युगात रंगाचे काही नाही, आम्ही रंग मानत नाही आदी. पण वधू-वर सूचक मंडळ आणि मॅट्रीमोनीयल साईट्सच्या अभ्यासातून समोर आलेला निष्कर्ष धक्कादायक आहे.

येथे लग्नासाठी १० पैकी ९ मुलांची गोऱ्या रंगाच्या मुलीलाच पसंती असते. पण यात जर मुलगी उच्चपदस्थ, पगार कमावणारी घेणारी असेल तर मात्र ती चालते, तिच्यासाठी रांगा लागतात. सध्या आपल्या देशात ९०% विवाह ‘अॅरेंज’ पद्धतीने होत असून मुलगी गोरी असावी ही पहिली अट तसेच ती सोज्वळ स्वभाव, सडपातळ बांधा, लांबसडक केस अडिणीलाही महत्व दिले जाते. वधू-वर सूचक मंडळ आणि मॅट्रीमोनीयल साईट्सच्या अभ्यासातून समोर आलेले काही केसेस आपण पाहुयात –

– प्रतिक्षा लोहारे या ३३ वर्षीय असून त्या त्यांचा अनुभव सांगतात की मी खेळाडू आहे. माझा रंग सावळा आहे. २ वर्षात ५-६ स्थळे बघितली होती पण पसंती कुणाचीच आली नाही. पण मला स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी लालगि आणि लग्नासाठी मुलांच्या रांगा लागल्या.

– २८ वर्षीय संदेश साठे सांगतात की, मला बालमैत्रिणीशी लग्न करायचे होते व तिच्या वडीलांनाही मंजूर होते. परंतु ती गोरी नसल्याने घरच्यांनी नकार दिला असे ते सांगतायत.

– ३८ वर्षीय समिक्षा माहूरकर त्यांचे प्रोफेशन आयटी आहे. त्या सांगतात की मला स्थळ येत नसल्याने पालक चिंतेत असायचे. मलाही अपमानास्पद वाटायला लागले होते पण मग ऑफीसमध्ये सावळ्या मुलाशी मी लग्न केले.

– असाही एक निष्कर्ष आहे की, मुलगा किंवा पालक वेबसाइटवर फिल्टर लावून केवळ गोऱ्या मुलींचे प्रोफाइल बघत असतात. नोकरी, पगाराची माहिती मिळाली तर मगच सावळ्या मुलीचे स्थळ त्यांना चालते.

– लग्न जुळवणाऱ्या काही वेबसाइट्सने केलेले सर्वेक्षणातील काही निष्कर्ष पाहुयात –
– १० पैकी ९ मुलींना नकार येतो तो त्यांच्या काळ्या रंगामुळे येतो.
– तब्बल ९४% मुलींवर सुंदर दिसण्यासाठी पालकांकडून दबाव असतो हे देखील समोर आले आहे.
– ८०% मुलींच्या मनांत लहानपणापासूनच रंग, वजनाची भीती पालकांनी घातलेली असते.
– ६१% मुलींच्या बाबतीत असे दिले की, त्यांच्या पालकांचाच मुली गोरे दिसण्यासाठी उपाय करण्याकडे कल आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe