Grah Gochar : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्वाचे स्थान आहे. ग्रहांच्या हालचालीत बदल होताच इतर १२ राशींवर त्याचा परिणाम होतो. अशातच ग्रहांचा राजकुमार बुध 6 नोव्हेंबर रोजी शत्रू राशीत वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तसेच यावर शनि आणि राहूची देखील दृष्टी पडत आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येईल.
बुधाचे संक्रमण काहींसाठी चांगले असेल तर काही राशींसाठी नकारात्मकता आणेल. बुध 27 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहील. यानंतर धनु राशीत प्रवेश करेल. अशास्थितीत येणारे 20 दिवस पाच राशींसाठी कठीण जाणार आहेत. कोणत्या या काळात लोकांना सावध राहण्याची गरज आहे जाणून घेऊया…
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण फारसे चांगले मानले जात नाही, या काळात वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नीट विचार करूनच कोणताही निर्णय घ्या. गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते. काही दिवस सहलीला जाऊ नका. सहलीला जाण्याचा बेत टाळा.
धनु
बुधाचे राशी बदल धनु राशीच्या लोकांसाठी अशुभ मानले जात आहे, या काळात वैवाहिक जीवनात गडबड होऊ शकते. कुटुंबात वाद होऊ शकतात. मानसिक तणाव असू शकतो. या काळात प्रवास शुभ राहणार नाही. प्रवास शक्यतो टाळा.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस फार काही खास नसणार आहेत. या काळात तुमच्या जोडीदाराशी तुमचे मतभेद होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात संकटे येतील. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया सल्ला घ्या. अन्यथा नुकसान होऊ शकते.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण देखील अशुभ सिद्ध होईल.आरोग्य बाबत काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. या काळात प्रवासाचे नियोजन करू नका. यावेळी प्रवास टाळा, या काळ तुमच्यासाठी चांगला नाही.
कर्क
कर्क राशीच्या लोकांनी येत्या 27 दिवसात काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात मानसिक तणाव वाढू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयींबाबत काळजी घेण्याची गरज आहे. गुंतवणूक टाळा नुकसान होण्याची शक्यता आहे. अल्कोहोलचे सेवन हानिकारक ठरू शकते. कळत घ्या.