Hair Care : प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होत आहे का?, फॉलो करा ‘या’ घरगुती टिप्स !

Ways To Protect Your Hair from Air Pollution : सध्या सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. वाहनांमध्ये झालेली लक्षणीय वाढ यामुळे प्रदूषणही वाढले आहे. वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने अनेकदा खोकला, डोळ्यांना खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास तसेच त्वचा निस्तेज होणे, यांसारख्या समस्या जाणवतात. याशिवाय वायू प्रदूषणाचा थेट परिणाम केसांवर देखील होतो. त्यामुळे केस कोरडे होऊ लागतात आणि त्यांची चमकही कमी होऊ लागते, अशास्थितीत केसांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

वायू प्रदूषणाचा थेट परिणाम केसांवर तसेच त्वचेवर होतो. अशा वेळी केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस कोरडे होऊ लागतात आणि त्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु काहीवेळा त्यांचा वापर देखील परिणाम देत नाही. अशा परिस्थितीत केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही घरगुती टिप्स वापरल्या जाऊ शकतात. या टिप्समुळे केसांवरील वायू प्रदूषणाचा प्रभाव कमी होऊन केस निरोगी राहतात.

तेल

वायू प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी केसांना आठवड्यातून एकदा तेलाने मसाज करा. असे केल्याने केसांना पोषण मिळेल आणि केस मुळापासून मजबूत होतील. खोबरेल तेल, आर्गन तेल आणि जोजोबा तेल केसांसाठी वापरता येते. हे तेल फक्त खराब झालेले केस दुरुस्त करत नाही तर केसांची चमक देखील वाढवते.

शैम्पूची योग्य निवड

प्रदूषणामुळे केसगळती तसेच अनेक समस्यांचा त्रास होतो, ही समस्या टाळण्यासाठी सल्फेट फ्री शॅम्पू निवडा. तसेच केस धुतल्यानंतर हायड्रेटिंग कंडिशनर वापरा. याच्या वापराने तुमचे केस स्वच्छ राहतील आणि केस गळणे टाळता येईल.

केस झाकून ठेवा

केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी केस नेहमी झाकून ठेवा. बाहेर जाण्यापूर्वी केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी टोपी किंवा स्कार्फ यांचा वापर करा. असे केल्याने, प्रदूषणाचे हानिकारक कण टाळूला नुकसान पोहोचवू शकतात.

हायड्रेटेड रहा

केस निरोगी ठेवण्यासाठी, प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी केसांना हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. वायू प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्या. असे केल्याने केसांचा कोरडेपणा कमी होईल आणि केस चमकदारही होतील.

निरोगी आहार

केसांना आतून मजबूत ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात संपूर्ण धान्यांसह काजू, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश जरूर करा. या गोष्टींचे सेवन केल्याने केस आतून मजबूत होतात. केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी या टिप्सचा वापर करा तुम्हाला लवकर फरक जाणवेल.