Happy Dussehra 2021 Messages :आपल्या प्रियजणांना द्या खास दसऱ्याच्या शुभेच्छा…या मेसेजेसद्वारे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- हिंदू धर्मामधील महत्वाच्या सणांपैकी एक असलेला सण म्हणजे ‘दसरा’ हा होय. आश्विन शुद्ध दशमी दिवशी हा उत्सव साजरा होतो.

आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेला देवीचे घट बसून नवरात्राला सुरुवात होते त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.

चांगल्याचा वाईटावर विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय, या हा सणामागील अर्थ आहे. यंदा 15 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे.

चला तर अशा या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही विजया दशमीचे मेसेजेस, एसएमएस, ग्रीटिंग, पाठवून आप्तेष्टांना, मित्र मंडळींना शुभेच्छा देऊ शकता.

1)

झेंडुची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

2)विजयादशमी दसरा शुभेच्छा | Vijayadashmi Dasara Shubhechha
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

3)

शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
विजया दशमीचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा…
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

4)

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
सोन्यासारख्या लोकांना, हॅप्पी दसरा!

5)
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लुटण्याचा,
नवे, जुने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
दसऱ्याच्या शुभेच्छा!

6)

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

7)

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe