Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ‘या’ 4 गोष्टी, बिघडू शकते आरोग्य…

Published on -

Health Tips : न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पण जेवणाचे देखील काही नियम आहेत, जेवणानंतर काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजे अन्यथा त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. असे म्हणतात रात्री रिकाम्या पोटी झोपणे योग्य नाही. रात्रीचे जेवण आहारात महत्त्वाची भूमिका बाजवतात. या काळात काही चुका करणे देखील टाळले पाहिजे. विशेषतः जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल.

रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या काही चुकांमुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात अनेक अडचणी येतात. त्यामुळे तुमच्या काही सवयी बदलून तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचे लक्ष्य गाठू शकता. चला, रात्रीच्या जेवणानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करून नये याबद्दल जाणून घेऊया…

रात्रीच्या जेवणानंतर लगेच पाणी टाळा

रात्रीच्या जेवणानंतर लगेच पाणी पिणे योग्य मानले जात नाही. असे केल्याने पचनाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. यासोबतच शरीरातील चयापचय क्रियाही बिघडते. त्यामुळे जेवणानंतर ३० मिनिटांनीच पाणी प्या. ते आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

मिठाई खाऊ नका

बऱ्याच जणांना जेवणानंतर गोड खाण्याची सवयी असते, रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थांचे सेवन करू नये. गोड पदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका

रात्रीचे जेवण करून लोक झोपतात असे अनेकदा पाहायला मिळते. पण असे करणे त्यांच्या शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते. असे केल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वजन कमी करण्यात अडचण येते. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यावर 10 ते 15 मिनिटे चालत जा.

चहा-कॉफीपासून लांब राहा

रात्रीच्या जेवणानंतर लगेच चहा आणि कॉफीचे सेवन करणे अत्यंत हानिकारक मानले जाते. या गोष्टींचे सेवन केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो त्यामुळे चयापचय मंद होतो. चयापचय मंद झाल्यामुळे वजन लवकर कमी होत नाही. म्हणून जेवणानंतर लेगच चहा-कॉफीचे सेवन करू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News