Health Tips : गाव – खेड्यांमध्ये आजही लोक तांब्याची आणि पितळांची भांडी वापरतात. साहजिकच आधीच्या तुलनेत आता याचे प्रमाण फारच कमी आहे पण तरीही काही ठिकाणी आपल्याला पितळाची तसेच तांब्याची भांडी नजरेस पडतात.
काही लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे सांगतात. नक्कीच ताब्यात असणारे गुणधर्म हे मानवी आरोग्यासाठी फायद्याचे आहेतच.

पण तांब्याच्या भांड्यातून काही लोकांनी चुकूनही पाणी प्यायला नको असा सल्ला दिला जातो. आता कोणत्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये याबाबत आज आम्ही तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहोत.
गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिला – अलीकडे अनेक जण कॉपरच्या बॉटल मधून पाणी पितात. याचे काही आयुर्वेदिक फायदे सुद्धा आहेत. पण गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांनी अशा बाटलीतुन पाणी पिऊ नये.
ऍलर्जी असणारे लोक – काहींना धुळीची ऍलर्जी असते तर काहींना वांग्याची ऍलर्जी असते. काही लोकांना तांब्याची सुद्धा एलर्जी असू शकते. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्यानंतर खाज, स्किन इरिटेशन अशा समस्या जाणवत असतील तर अशा लोकांना याची ऍलर्जी आहे असे समजावे.
विल्सन रोग – हा एक दुर्मिळ रोग आहे. हा एक अनुवांशिक म्हणजेच पिढ्यानपिढ्या सुरू असणारा रोग आहे. पण अशा लोकांनी कॉपरच्या बाटलीतून पाणी पिणे थांबवावे. कारण असे केल्याने या रोगाने ग्रस्त लोकांच्या शरीरात जाणारे तांबे यकृत, मेंदू आणि इतर अवयवांमध्ये जमा होण्यास सुरवात होते.
किडनीच्या आजाराने ग्रस्त लोकांनी – सुद्धा तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे टाळावे. ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास असेल त्या लोकांनी सुद्धा तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये असे म्हटले जाते. किडनी संबंधित समस्या असतील तर तुमच्या शरीरात कॉपर जमा होऊ शकते.