Health Tips : अनेकांची सकाळ ही विविध प्रकारे सुरु होते. अनेकांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी लागते तर काहींना कॉफी पिण्याची इच्छा असते. आपल्यापैकी अनेकांचा दिवस गरमा गरम चहा किंवा कॉफीने सुरू होतो. जर सकाळी उठल्यानंतर चहा-कॉफी घेतली नाही तर त्यांना दिवसाची सुरुवात झाली आहे असे वाटतच नाही.
महत्त्वाचे म्हणजे चहा आणि कॉफी शिवाय जगणे अशक्यच होईल अशी अनेकांची सवय असते. परंतु जर तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर लगेच कॉफी पिण्याची सवय असल्यास तर तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण सकाळी उठल्यानंतर एक तासापर्यंत कॉफी पिणे टाळावी. नाहीतर तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही सवय तुम्हाला असेल तर लगेचच बदलून टाका.
तज्ञांच्या मतानुसार, झोपेतून उठल्याच्या एक तासाच्या आतमध्ये चुकूनही कॉफी पिऊ नका. समजा जर तुम्हाला वाटत असेल की कॉफीमुळे तुम्हाला ऊर्जा मिळते किंवा झोप येत नाही तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. कॉफीचे वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतात.
जाणून घ्या तज्ञांचे मत
तज्ञांनी असे स्पष्ट केले आहे की, ‘दिवसाच्या वेळी तुमचा मेंदू अॅडेनोसिन नावाचे रसायन तयार करत असतो, ज्यामुळे झोपेला प्रोत्साहन मिळते. जर तुम्ही जास्त वेळ जागे राहिला तर हे रसायन वाढत जाते आणि तुम्हाला झोप येते. परंतु कॅफीन अॅडेनोसिन रिसेप्टर्सना अवरोधित करते जे तुम्हाला सतर्क आणि जागृत ठेवत असतात.
ही आहे कॉफीची योग्य वेळ
तज्ञांच्या मतानुसार, सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिऊ नये कारण सकाळी कोर्टिसोलची पातळी मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर दुपारी 2 नंतर कॉफीचे सेवन करू नये. कॉफी प्यायल्यानंतर एकूण पाच ते सात तासांनंतरही तुमच्या शरीरामध्ये अर्धे कॅफीन तसेच राहते, त्यामुळे तुम्हाला झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला झोपेचा त्रास टाळायचा असेल तर तुमची दिवसाची शेवटची कॉफी दुपारी 2 च्या सुमारास घ्यावी.