Healthy Diet : बाप रे ! मीठ कमी खाल्ल्याने होऊ शकते शरीराचे नुकसान? जाणून घ्या…

Published on -

Effect of Lower Salt Intake on Health : शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपला आहार योग्य असणे फार गरजेचे आहे. तुमच्या आहारात सर्व प्रकारच्या पोषक आणि गुणधर्मांनी समृद्ध पदार्थांचा समावेश केल्याने तुम्हाला बरेच फायदे मिळतात. अनेक वेळा लोक आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करणे थांबवतात किंवा कमी करतात. असे केल्याने शरीरात काही गोष्टींची कमतरता होण्याचा धोका वाढतो.

आहारात मिठाचे प्रमाण संतुलित असावे. परंतु गैरसमज किंवा माहितीच्या अभावामुळे लोक मीठाचे सेवन पूर्णपणे बंद करतात. यामुळे शरीराला काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते. मीठ हा आयोडीनचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो. मीठ जास्त किंवा कमी खाणे शरीरासाठी खूप हानिकारक मानले जाते. आजच्या या लेखात आपण मीठ कमी खाण्याचे तोटे जाणून घेणार आहोत.

कमी मीठ खाण्याचे तोटे :-

सोडियम, आयोडीन, क्लोराईड आणि इलेक्ट्रोलाइट्सचा मुख्य स्त्रोत म्हणजे मीठ. आहारात मिठाची कमतरता केल्याने शरीरात इन्सुलिनशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि रक्तातील साखर वाढण्याचाही धोका असतो. आहारात मीठ कमी केल्याने पोटाशी संबंधित समस्यांना तुम्हाला समोरे जावे लागू शकते.

-मीठ कमी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते. यामुळे स्नायूंमध्ये क्रॅम्प, कमकुवतपणा, वेदना यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

-खूप कमी मीठ खाल्ल्याने शरीरात आयोडीनची कमतरता होऊ शकते. आयोडीनच्या कमतरतेमुळे तुम्हाला गलगंड सारख्या आजारांचा धोका होऊ शकतो. मीठ हा आयोडीनचा मुख्य स्त्रोत मानला जातो.

-कमी मीठ खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो.

-मीठ कमी खाल्ल्याने शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. यामुळे शरीरात एलडीएल कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो.

-मीठ कमी खाल्ल्याने शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे थायरॉईड ग्रंथी नीट कार्य करू शकत नाही, ज्यामुळे हायपोथायरॉईडीझमचा धोका वाढतो.

टीप : लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीचे जास्त किंवा कमी सेवन तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचे आहारात योग्य संतुलन असावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News