Healthy Diet : सध्याच्या या धावपळीच्या जीवनात लोकांचा आहार पूर्णपणे बदलला आहे. सध्या लोकं जास्तीत-जास्त फास्ट फूड खाण्याकडे लक्ष देत आहेत. म्हणूनच सध्या आरोग्याच्या समस्या देखील वाढल्या आहेत. आहार योग्य नसेल तर आपल्याला दिवसभर आळशीपणाही जाणवतो. तसेच कामाकडे पूर्ण लक्ष लागत नाही. म्हणूनच अशा पदार्थांपासून आपण लांब राहिले पाहिजे त्याने आपली एनर्जी कमी होत आहे.
आजच्या व्यस्त जीवनात शरीरातील एनर्जी टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे. अनेकवेळा आपल्याला अचानक शरीरातील उर्जा कमी जाणवते त्यामुळे आपले दिवभराचे काम राहते. जर तुमच्या बाबतीही असे घडत असेल तर याचे कारण तुमचा आहार असू शकतो. दैनंदिन जीवनात आपण असे अनेक पदार्थ खातो, जे शरीरासाठी हानिकारक असतात आणि शरीरातील थकवाही वाढवतात.

या पदार्थांचे सेवन केल्याने शरीर क्रियाशील राहत नाही आणि कधीकधी आपल्याला थकवा जाणवतो. जर तुम्हालाही तुमच्या शरीरात उर्जेची कमतरता जाणवत असेल तर तुम्हीही नकळत या पदार्थांचे सेवन करत आहात. आज आपण शरीरातील ऊर्जा कमी करणाऱ्या अशाच पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या शरीरातील एनर्जी कमी होते.
साखरयुक्त पदार्थ
-अनेकांना मिठाई खायला खूप आवडते, पण मिठाई जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला हानी होते आणि शरीरातील ऊर्जाही कमी होते. जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि चिडचिड होऊ शकते. शरीराची उर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात फळे आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. शक्यतो असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. याच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका वाढतो. तळलेले पदार्थ ऊर्जा पातळी कमी करतात. यातील चरबी रक्तवाहिन्यांना रोखून रक्तप्रवाहावर परिणाम करू शकते. तसेच, शरीर त्यांना पचवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करते, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
प्रक्रिया केलेले पदार्थ
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मीठ आणि चरबी जास्त असू शकते, ज्यामुळे सुस्ती आणि उर्जेची कमतरता होऊ शकते. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये असलेली रसायने आणि गोड पदार्थ देखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव वाढवू शकतात. अशा परिस्थितीत त्यांचे सेवन टाळावे. त्यांच्या सेवनाने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
अल्कोहोल
शरीराला हानी पोहोचवण्यासोबतच, अल्कोहोलच्या सेवनाने तुमची ऊर्जा देखील कमी होते. डिहायड्रेशनसोबतच शरीरातील रक्तातील साखरही वाढते. अल्कोहोलच्या वापरामुळे ऊर्जा कमी होते आणि झोपेची पद्धत देखील बदलू शकते. अशा परिस्थितीत अल्कोहोल पिणे टाळावे.
कॅफिनयुक्त पदार्थ
कॅफिन शरीराची उर्जा त्वरित वाढवू शकते परंतु त्याचे सेवन झोपण्याच्या पद्धतीमध्ये अडथळा आणू शकते. जास्त प्रमाणात कॉफी घेतल्याने डिहायड्रेशन होऊ शकते आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो. दिवसभरात कमीत कमी कॅफिनचे सेवन करण्याचा प्रयत्न करा.