Healthy Habits : उन्हाळा असो थंडी असो की पावसाळा, भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले आहे. पाणी आपल्या शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे, ज्याच्या कमतरतेमुळे केवळ पाचन तंत्रावरच परिणाम होत नाही तर त्वचा आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. निरोगी राहण्यासाठी, पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
पण पाणी पिण्यासाठीही काही नियम बनवले आहेत, तुम्ही अनेकदा ऐकले असेल की एका श्वासात पाणी पिऊ नये, बसून पाणी प्यावे. वास्तविक, पाणी पिण्याशी संबंधित अनेक आरोग्यदायी सवयी आहेत. अनेक वेळा तुम्ही भरपूर पाणी पितात, पण तरीही पचन किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. अशातच आज आम्ही पाण्याशी संबंधित असे 5 नियम सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्याने तुम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

पाणी पिण्याशी संबंधित 5 आरोग्यदायी नियम !
कोमट पाणी प्या
कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. तुमचे पोट यामुळे स्वच्छ राहादते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. याशिवाय दिवसभर अन्नपचन व्यवस्थित होते.
जेवणानंतर लेगच पाणी पिऊ नये
बऱ्याच व्यक्तींना जेवणानंतर लगेच पाणी प्यायची सवय असते. मात्र ही सवय अत्यंत वाईट आहे. जेवणानंतर लगेच पाणी कधीच पिऊ नये. जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने पाणी पिण्याची पिण्याचा सल्ला दिला जतो, असे केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
बसून पाणी प्या
कधीही उभे राहून पाणी पिऊ नये, नेहमी बसून पाणी प्यावे, असे केल्यास तुमच्या शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे पचनास मदत होते. उभे राहून किंवा चालताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते आणि पचनाच्या समस्याही निर्माण होतात.
थंड पाणी पिणे टाळा
अनेकांना फ्रिजमधील थंडगार पाणी प्यायला आवडते, पण असे केल्यास त्वचा आणि आरोग्य दोन्हीचे नुकसान होते. लोक जास्त करून उन्हाळ्यात थंड पाण्याचे सेवन करतात. उन्हाळ्याच्या दिवसात फ्रिजऐवजी माठातील पाण्याचे सेवन करा. यामुळे त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते.
एका श्वासात पाणी पिणे टाळा
एकाच वेळी अथवा एका श्वासात भरपूर पाणी पिणे टाळले पाहिजे. अनेकांना अशी सवयी असते, पण ही सवयी चुकीची आहे, म्हणून पाणी नेहमी आरामात प्यावे आणि एक-एक घोट पाणी प्यावे. पोटाचे आरोग्य आणि पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी याचा फायदा होतो.