भारी रे भारी ! ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट म्हणून मालकाने वाटल्या कार

Ahmednagarlive24 office
Published:

Diwali gift : हरयाणातील एका फार्मा कंपनीच्या मालकाने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे. फार्मा कंपनी ‘मिट्सकार्टचे मालक एम. के. भाटिया यांनी दिवाळीनिमित्त नव्या कोऱ्या कार आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

या 12 कर्मचाऱ्यांना गाडीची चावी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांना गाडीची चावी दिल्यानंतर फार्मा कंपनीच्या मालकाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या टीमचे कौतुक केले.

त्याचबरोबर पुढील वर्षी कर्मचाऱ्यांना आणखी यापेक्षाही चांगल्या गिफ्ट देण्याबाबत वाच्यता केली. भाटिया यांनी अनेक वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू केली होती. ज्या कर्मचाऱ्यांना गाडीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत, त्यातील बहुतांश कर्मचारी सुरुवातीच्या काळापासून कंपनीत कर्मचारी म्हणून आहेत.

* या कंपनीची सुरुवात २०१५ मध्ये छोट्याशा ऑफिसमध्ये झाली

“काही काळापूर्वी जेव्हा आमची टीम वाढत होती, तेव्हा मी म्हटले होते की तुम्ही (सर्व कर्मचारी) आमचे स्टार आहात. नंतर आम्ही ग्रोथ करत गेलो… आम्ही कर्मचाऱ्यांना सेलिब्रेटींसारखे फील करू इच्छित होतो. प्रत्येकजण सेलिब्रिटी असतो…

मी आधीपेक्षा मोठा झालोय असे नाहीये, अनेक अपयशांना तोंड देऊन इथपर्यंत आलो आहे. असे भाटिया म्हणाले. कंपनीप्रती कर्मचाऱ्यांची मेहनत, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचे हे बक्षीस असल्याचे त्यांनी सांगितले.

कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना आम्ही कार भेट दिली आहे. लवकरच आणखी 38 कर्मचाऱ्यांना गाडीच्या चाव्या देण्यात येणार आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शिल्पा नावाच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, “मला येथे 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मी खूप आनंदी आहे। आठ वर्षांपूर्वी मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा आमचे डायरेक्टर म्हणायचे की त्यांना त्यांच्या टीमला कार गिफ्ट द्यायच्या आहेत. अन आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे. अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

* कर्मचारी झाले हर्षोल्हासित

मिट्स हेल्थकेअरच्या संचालकांनी सांगितले की, प्री-गिफ्टची खास गोष्ट म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यात आले होते, त्यापैकी काही कर्मचाऱ्यांना कार कशी चालवायची हेही माहित नाही. कंपनी त्यांना कार भेट म्हणून देईल, असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. ही भेट मिळाल्याने या कर्मचाऱ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe