Holi 2023 : होळी खेळण्यापूर्वी ‘हे’ काम कराच ; होणार मोठा फायदा नाहीतर ..

Published on -

Holi 2023 :  देशात 7 मार्च म्हणजेच उद्या होळी दहन आणि 8 मार्च रोजी रंगाची होळी साजरी करण्यात येणार आहे. रंगाची होळी साजरी करताना एकमेकांना सर्वजण रंग लावतात. यामुळे अनेकांच्या त्वचेला होळीच्या रंगांमुळे हानी पोहोचते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या होळीच्या रंगामुळे काही लोकांच्या त्वचेला लालसरपणा येतो तर अनेकांची त्वचा कोरडी देखील होते.

याचा मुख्य कारण म्हणजे रंगांमध्ये जड रसायने असतात. अशा वेळी जर तुम्हालाही होळी खेळण्याची आवड असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. होळी खेळण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे आम्ही तुम्हाला सांगतो. चला मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

होळी खेळण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

अशा प्रकारे करा त्वचेची काळजी

होळीचे रंग टाळण्यासाठी आदल्या रात्री त्वचेला तेलाने मसाज करा. आता चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा आणि टोनरने त्वचा योग्य प्रकारे हायड्रेट करा, त्यानंतर मॉइश्चरायझ वापरा. मानेपासून चेहऱ्यापर्यंत संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावा.आता त्वचेची निगा पूर्ण झाल्यावर आता चेहऱ्याला तेल लावा. असे केल्याने त्वचा जास्त काळ हायड्रेट राहील आणि रंग लावल्याने तुमच्या त्वचेवर कोणताही परिणाम होणार नाही.

बर्फाने मसाज करा

होळीचे रंग टाळण्यासाठी आईस मसाज देखील खूप फायदेशीर आहे.होळी खेळण्यापूर्वी 10 मिनिटे बर्फाने त्वचेची मालिश करा यामुळे होळी खेळताना तुमच्या त्वचेला इजा होणार नाही आणि रंगही सहज निघेल.

खोबरेल तेल लावा

रंग खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा. ज्यामुळे रंग तुमच्या त्वचेच्या आत जाणार नाही आणि तुमची त्वचा कोरडेपणा आणि नुकसान होण्यापासून वाचेल.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती अंगीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. आम्ही याची पुष्टी करत नाही.)

हे पण वाचा :- Electricity Bill : वीज बिल भरण्यापूर्वी ‘ह्या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर लागणार 3 हजारांना चुना

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe