एलॉन मस्कला नक्की बायका किती आणि त्याच्या मालमत्तेचे वाटेकरी किती, असा प्रश्न सध्या विचारला ” जात आहे. याला कारण आहे त्याच्या सहकारी महिलेने नुकत्याच त्याच्या आणखी एका अपत्याला जन्म दिला.
टेल्साचा संस्थापक एलॉन मस्कच्या आयुष्यात एकूण तीन महिला आल्या. त्यांच्यापासून त्याला ११ मुले झाली आहेत. पहिली पत्नी जस्टीन विल्सन आहे. तिला सहा अपत्ये एलॉनपासून झाली. दोघांचा २००८ मध्ये काडीमोड झाला. त्यानंतर एलॉनचे कॅनेडियन संगीतकार ग्रिम्सशी सूत जुळले. तिच्यापासून त्याला तीन अपत्ये झाली. यानंतर त्याची सह कर्मचारी शिव्हॉन झिलीस ही त्याच्या जुळ्यांची आई बनली.
मस्कच्या आत्मचरित्रात त्याच्या अकराव्या मुलाचे नाव टेक्ने मॅकेनियस असे ठेवले आहे. त्याला लाडाने ताओ हाक मारतात. ताओचे नक्की वय कुणाला माहिती नाही. ग्रिम्सने त्याच्याबद्दल सोशल मीडियावर खुलासा केला होता, परंतु तो तत्काळ पुसलाही होता. मस्कप्रमाणे त्याची मुलेही चर्चेत असतात.
त्याचा मुलगा झेव्हियर याने २०२२ मध्ये आपले नाव बदलून विवान केले होते. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याचा वडिलांशी काहीएक संबंध नाहीत. त्याने त्याचे लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून घेतली. जस्टीन विल्सनपासून एलॉन यांना विवान झाली आहे.
२००४ मध्ये जन्मलेल्या विवानला जळा भाऊ ग्रिफीन हा आहे. यानंतर जस्टीनला एलॉनपासून तिळं झाले. त्यांची नावे काई, दामियन आणि सॅक्सॉन अशी आहे. या सगळ्यात थोरला होता नेवडा अलेक्झांडर. २००२ मध्ये तो वारला. तिळ्यांचा जन्म २००६ मध्ये झाला. दोघांचा विवाह २००० मध्ये झाला होता.
आपल्या आत्मचरित्रात मस्कने लवकर लग्न व्हावे आणि भरपूर मुलं असावीत अशी इच्छा व्यक्त केली होती. घटस्फोटानंतर दोघांत मुलांच्या ताब्यावरून वाद झाला नाही. त्यानंतर मस्कचे सूत ब्रिटिश अदाकारा तुलुलाह रिलेशी जमले. तिच्यापासून त्याला झेव्हियर ऊर्फ विवान आणि ग्रिफीन ही मुले झाली.
आपल्या मुलांना स्वतःच्याच शाळेत शिकवण्याची योजना मस्कने आखली. २०१८ मध्ये त्याने स्पेस एक्सचे मुख्यालय हाऊथ्रोन या कॅलिफोर्नियातल्या शहरात खास शाळा उघडली. ‘टी द स्टार्स’ असे या शाळेचे नामकरण केले. तिथे त्याची आणि स्पेस एक्सच्या काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांचीच मुले शिकतात.
मस्कची पार्टनर म्हणवणाऱ्या ग्रिम्सने ‘एक्स एई’, ‘ए एक्सआयआय’ आणि मुलगी ‘एक्झा डार्क सायडर’ अशा तीन मुलांना जन्म दिला. ताओची आईही ग्रिम्सच असल्याचे सांगितले जाते. ग्रिम्सचे खरे नाव क्लेअर बाऊचर असे आहे.
एलॉनची कंपनीतली कर्मचारी शिव्हॉन झिलीस हिने स्ट्रायडर आणि एझ्युरे या जुळ्यांना जन्म दिला. ग्रिम्सला एक्झा नावाचे अपत्य झाले, त्याचवेळेस एलॉनने आपल्या कंपनीतली कर्मचारी शिव्हॉन गर्भवती असल्याचे तिला सांगितले होते.
यामुळे ग्रिम्स चांगलीच संतापली होती. शिव्हॉन ग्रिम्स चांगलीच संतापली होती. शिव्हॉन ही मस्क यांच्या कंपनीची संचालक तर आहेच, परंतु न्यूरोलिंक या प्रकल्पातही ती संचालक आहे. ट्विटरची बॉस म्हणूनही तिची ओळख आहे