जाणून घ्या विजयादशमी निमित्त कसे कराल शस्त्रपूजन

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- आज नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने होणार आहे.

यंदाचा दसरा हा आज म्हणजेच १५ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी अनेक शुभकार्य केली जातात.

नवीन वस्तू, घर, गाडी खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. तसंच विजयादशमी निमित्त सोनं खरेदीसाठी लोकं मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

आश्विन शुद्ध दशमी तिथी आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून ‘विजयादशमी’ या नावाने ओळखला जातो.

या दिवशी रावण दहनासह सरस्वती पूजन, शस्त्र पूजनही केले जाते. चला तर मग जाणून घेऊ शस्त्रपूजन, सरस्वती पूजन कसे करायचे तसेच यासाठी नेमका काय असणार आहे शुभ मुहूर्त…

सरस्वती पूजन:
पाटी, वहीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चिन्ह काढा.
एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर साकारलेले सरस्वतीचे चिन्ह ठेवा.
त्यासोबतच अभ्यासाची पुस्तके मांडा.
सध्याच्या डिजिटल युगात लॅपटॉप, कॉम्प्युटरवर कामे असल्याने त्यांचीही पूजा करा
त्यानंतर हळद-कुंकू अक्षता वाहा. फुलं वाहा. दिवा-अगरबत्ती ओवाळून नमस्कार करा.
सरस्वती कला आणि विद्येची देवता असल्याने दसऱ्यादिवशी वाद्यांच्याही पूजा केली जाते.

शस्त्रपूजन:
शस्त्रं पूजनाची परंपरा पांडवांपासून सुरु झाली. सरस्वती पूजनासोबत शस्त्रपूजन करण्यासाठी त्याच पाटावर किंवा शेजारी घरातील शस्त्र म्हणजे सुऱ्या,

विळी, स्क्रु ड्राव्हर, पक्कड इत्यादी मांडून त्याची पूजा करा. त्यानंतर एखादा गोड पदार्थ किंवा साखर यांचा नैवैद्यही दाखवला जातो. तसंच शेजारी आपट्याच्या पानांची जुडी ठेवून त्याचीही पूजा केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe