Bottled Water : फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये प्लास्टिकच्या बॉटलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या प्लास्टिक बाटल्यांमधून पाणी पिण्याचा ट्रेंड देखील खूप वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते. एका अभ्यासानुसार, प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने शरीरात लाखो कण विरघळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. आज आपण प्लास्टिकच्या बॉटने पाणी पिण्याचे नुकसान जाणून घेणार आहोत.
एका संशोधनानुसार, एका लिटरच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये सुमारे 240,000 प्लास्टिकचे कण आढळतात. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये नॅनोप्लास्टिक्स आढळतात, ज्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. या नॅनोप्लास्टिकची लांबी सुमारे एक मायक्रोमीटर आहे. अभ्यासानुसार, हे नॅनोप्लास्टिक्स 10 ते 100 पट जास्त असू शकतात. हे प्लास्टिक प्लेसेंटा ट्यूबद्वारे शरीरात पोहोचू शकते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान मुलावर परिणाम होऊ शकतात.

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लहान कण आढळतात
प्लास्टिकच्या बॉटलमधील हे कण शोधण्यासाठी संशोधकांनी नवीन सूक्ष्मदर्शक तंत्रज्ञानाचा वापर केला. अभ्यास केल्यानंतर, त्यांना असे आढळले की एक लिटर प्लास्टिकच्या बाटलीमध्ये 110,000 ते 370,000 लहान कण असतात, त्यापैकी 90 टक्के नॅनो कण असतात. संशोधकांच्या मते, प्लास्टिकच्या बाटल्या साधारणत: 7 प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवल्या जातात.
प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिण्याचे तोटे :-
-प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे अनेक प्रकारे हानिकारक आहे.
-प्लास्टिकच्या बाटलीतील गरम पाणी पिताना बाटलीतून अनेक रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्हाला गंभीर आजारांना बळी पडू शकते.
यामुळे अंडाशयाशी संबंधित आजारही होऊ शकतात.
-यामुळे हायपोथायरॉईडीझम आणि कॅन्सरचा धोकाही वाढतो.
-प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने मधुमेह आणि हृदयविकाराचाही धोका वाढतो. तसेच याचा रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. प्लास्टिक बाटलीमुळे पाण्यात मिसळलेले रसायन शरीराला आतून कमकुवत बनवतात.