Dream Astrology : रात्री झोपल्यानंतर अनेकदा आपण स्वप्नांच्या दुनियेत भटकत असतो, ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. यातील काही स्वप्ने खूप भीतीदायक असतात, तर काही स्वप्ने खूप आनंददायी असतात. एखादी व्यक्ती झोपेतून उठल्यानंतर काही स्वप्ने विसरते, तर काही स्वप्ने उठल्यानंतरही अनेक दिवस लक्षात राहतात.
पण स्वप्न विज्ञानानुसार, स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा भविष्याशी निगडीत काही ना काही अर्थ असतो, आजच्या लेखात आपण स्वतःला, स्वतःच्या स्वप्नात पाहण्याचा काय अर्थ होतो हे जाणून घेणार आहोत, चला तर मग…
स्वप्नात स्वतःत विविध अवस्थेत पाहणे
-स्वप्न विज्ञानानुसार, स्वतःला रडताना पाहणे हे एक प्रकारचे विशेष लक्षण असू शकते, जे तुम्हाला आगामी काळात सकारात्मक परिणाम आणि यशाकडे निर्देश करत आहे.
-स्वप्नात स्वतःला स्मशानभूमीत पाहणे शुभ लक्षण मानले जाते असे स्वप्न शास्त्रात सांगितले आहे. हे स्वप्न सूचित करते की आपण लवकरच जीवनात प्रगती आणि समृद्धी प्राप्त कराल.
-स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात आत्महत्या करताना पाहणे शुभ मानले जाते. हे स्वप्न मोठ्या आनंदाचे, समृद्धीचे किंवा आत्म-समाधानाचे लक्षण मानले जाते.
-स्वप्नात स्वतःला आकाशातील ताऱ्यांकडे पाहणे हे खूप शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न आयुष्यात मोठे पद, प्रतिष्ठा किंवा यश मिळवण्याचे लक्षण मानले जाते.
-स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात स्वत:ला गरीब दिसणे देखील शुभ लक्षण मानले जाते. हे स्वप्न सांगते की तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या संपणार आहेत आणि तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत. कारण ते व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणि समृद्धीच्या काळाकडे निर्देश करते.
-स्वप्नात कपड्यांशिवाय स्वतःला पाहणे हे स्वप्नशास्त्रानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व, मानसिक स्थिती आणि भावनांशी संबंधित आहे. हे शारीरिक आजार किंवा रोगाचे लक्षण मानले जाते.